गुहागर, ता. 23 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा 24 वा वर्धापन दिन नुकताच संस्थेच्या कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा, ता. गुहागर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध पुरस्कारांचे वं सत्कारांचे आयोजन करण्यात आले होते तसेच दिव्यांग, विधुर व विधवा, घटस्फोटीत व्यक्तींसाठी वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute
या कार्यक्रमासाठी गुहागर पंचायत समितीचे सभापती मा. श्री.प्रणवजी पोळेकर, उपसभापती मा. श्री.निलेशजी सुर्वे, माजी सभापती व नगराध्यक्ष मा. राजेशजी बेंडल, उपनगराध्यक्ष मा श्री प्रदीपजीं बेंडल, मा श्री मुकुंद कानडे, चिपळूण, मा श्री मधुसूदन केतकर चिपळूण, वरवेली गावचे सरपंच मा. श्री.नारायण आग्रे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मा सौ शिरभाते मॅडम, जिल्हा परिषद रत्नागिरी, संस्थेचे जेष्ठ सल्लागार मा श्री विनायक ओक, मा श्री प्रकाशजी बापट, मा श्री किरण शिंदे, मा श्री. रवींद्रजी कुळये, मा श्री महेंद्र देवळेकर, मा श्री श्रीकांत वेल्हाळ, मा श्री डी पी गुरव,, सर्पमित्र व सल्लागार मा श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सुधाकर कांबळे, पालशेत हायस्कूलचे मुख्याध्यापक बोलभाट, पाटपन्हाळे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ चव्हाण मॅडम, काजुर्ली हायस्कूलचे मुख्याध्यापक मा श्री घाग, लिटिल चॅम्प्स इंग्लिश मिडीयम चे मुख्याध्यापक मा.श्री शिरकर, श्री उमेश खैर, श्री समिर पावस्कर, गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मा श्री मनोजजी बावधनकर, पत्रकार श्री गणेश धनावडे, श्री गणेश किर्वे, ग्रामसेवक श्री भुवड, जिल्हा परिषद रत्नागिरीचे समाजकारण विभागाचे श्री रसाळ, संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग, उपाध्यक्ष प्रकाश अनगुडे, सरचिटणीस सुनील रांजणे आदी मान्यवर उपस्थित होते. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री उदय रावणंग यांनी संस्थेने 24 वर्षांमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांची व कार्यक्रमांची माहिती दिली तसेच भविष्यामध्ये असणाऱ्या संस्थेच्या योजनेची माहिती व दिव्यांगाना भासणाऱ्या अडचणी प्रामुख्याने मांडल्या. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वच प्रमुख पाहुण्यांनी संस्थेचे कौतुक करून संस्थेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute

या कार्यक्रमांमध्ये संस्थेतर्फे दिल्या जाणारा मानाचा असा दिव्यांग साथी पुरस्कार श्री सत्यवान घाडे (पत्रकार, दैनिक तरुण भारत) तसेच दिव्यांग मित्र पुरस्कार श्री विनायक जाधव सर (सहाय्यक शिक्षक श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर) यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. तर दिव्यांगात्वावर मात करून स्वतःचा व कुटुंबाचा उदार निर्वाह करणाऱ्या असे अनंत पालकर पालपेणे यांना स्वयंसिद्ध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute
याच कार्यक्रमांमध्ये संस्थेला निधी संकलन उपक्रमात उल्लेखनीय निधी गोळा करुन दिल्याबद्दल विद्यार्थी शाळा व केंद्र प्रमुख यांचाही सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांच्यामार्फत नासा व इस्रो भेटीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हा परिषद शाळातील पाच विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह भेटवस्तू देऊन करण्यात आला. गरजू दिव्यांगाना कुबड्या, व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, मानेचे पट्टे, गुडघ्याचे पट्टे, वॉकिंग स्टिक ( काठी ) इत्यादी कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यात आले. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute

याच कार्यक्रमांमध्ये राज्यस्तरीय वधू वर सूचक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये सर्व प्रकारच्या 83 दिव्यांगांनी नाव नोंदणी केली. यामध्ये मुलींची संख्या खूपच कमी असल्याने या मेळाव्यामध्ये विवाह जुळण्याची प्रक्रिया झाली नाही. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute
अध्यक्ष भाषणामध्ये श्री मुकुंद कानडे सर यांनी सर्व प्रकारच्या दिव्यांगांनी दिव्यांगांसाठी चालवलेल्या या सेवाभावी संस्थेला 24 वर्षे पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले या संस्थेने 24 वर्षात अनेक कठोर परिश्रम करून संस्था नावा रूपाला आणून संस्थेचे स्वतःचे कार्यालय व स्वतःची जागा घेतली असून त्यामध्ये विविध उपक्रम कार्यक्रम राबविते या संस्थेला शासनाची मान्यता मिळाली असून कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. या संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी दानशूर लोकांनी तसेच राजकीय पुढाऱ्यांनी दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा मानून सर्वतोपरी मदत केली पाहिजे असे विचार व्यक्त केले. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute

या कार्यक्रमासाठी वरवेली गावचे व्यावसायिक श्री योगेंद्र विचारे तसेच एअर मार्शल हेमंत भागवत साहेब, श्री मधुसूदन केतकर सर चिपळूण, सौ विद्या ओक मॅडम चिपळूण, श्री सुहास सातार्डेकर यांनी आर्थिक व वस्तूरूपी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निलेश गोयथळे वं रुपेश सौंदेकर सर यांनी केले. तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रकाश अनगुडे यांनी मानले. दुसऱ्या सत्रामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व दिव्यांगांसाठी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी संचालक श्री अनिल जोशी, श्री प्रवीण मोहिते, श्री. भरत कदम, श्री संतोष घुमे, श्री संतोष कदम, नीता पालशेतकर, सौ.पुनम रावणांग, श्री गौरव शिरगावकर,,श्री निंबरे, श्री यशवंत पाष्टे, श्री. सुनील जोशी, श्री पागडे आदींनी विशेष प्रयत्न केले. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute
