• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पिण्याच्या पाण्यातून केमिकल मिश्रित पाण्याचा पुरवठा

by Guhagar News
April 22, 2026
in Ratnagiri
108 1
0
Supply of chemically mixed water from drinking water
212
SHARES
607
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लोटे एमआयडीसीत खळबळ; १० जण रुग्णालयात

गुहागर, ता. 22 : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील सुप्रिया लाईफ सायन्सेस या कंपनीचे केमिकलयुक्त सांडपाणी चक्क एमआयडीसीच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळल्याने संपूर्ण लोटे परिसरात खळबळ उडाली आहे.” “आज सकाळी घराघरातील नळांमधून हे रासायनिक पाणी आल्याने ते पाणी वापरणाऱ्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना बाधा झाली आहे. Supply of chemically mixed water from drinking water

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे ८ ते १० जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने लोटे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.” “एमआयडीसी प्रशासनाच्या आणि संबंधित कंपनीच्या या गंभीर निष्काळजीपणामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, परिसरात सध्या तीव्र संतापाची लाट आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.” Supply of chemically mixed water from drinking water

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSupply of chemically mixed water from drinking waterटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share85SendTweet53
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.