गुहागर वरचापाट येथे दि. 28 एप्रिल ते 1 मे रोजी विविध कार्यक्रम
गुहागर, ता. 16 : वरचापाट येथील श्री दुर्गादेवीचा 19 वा वर्धापन सोहळा दि. 28 एप्रिल ते 1 मे असा चार दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने अखिल जगताच्या कल्याणासाठी, सृष्टी संवर्धनासाठी शतचंडी हवन तसेच हिंदू स्नेह संमेलन सोहळा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री दुर्गादेवी देवस्थान फंडचे अध्यक्षांनी दिली आहे. Anniversary celebration of Shri Durga Devi
वर्धापन दिनानिमित्त दररोज स. 6 ते 6.30 श्रींची महापुजा, सायं. 6.30 ते 7.00 श्रींची सायंपूजा, सायं. 7.15 ते 8 वा. श्रींचा गोंधळ, आरती व मंत्रपुष्पांजली असे कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. Anniversary celebration of Shri Durga Devi

श्री दुर्गादेवीच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त मंगळवार दि. 28 रोजी सकाळी 07.00 वा. मंदिर सम्प्रोक्षणविधी व मंदिर नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा, स. 8 वा. शतचंडी पाठ वाचन प्रारंभ, दुपारी 3.30 ते 5.30 श्रींच्या महावस्त्रांचा लिलाव, सायं. 6.00 ते रात्रौ 10.00 हिंदू स्नेह संमेलन सोहळा, सायं. 6.30 वा. मान्यवर गुरुजींच्या हस्ते श्रींची सायंपूजा. बुधवार दि. 29 रोजी सकाळी 7.30 वाजता शतचंडी पाठ वाचन, दुपारी 3.30 ते 5.30 श्रींच्या महावस्त्रांचा लिलाव, रात्रौ 10.00 वा. भावे नाट्य मंदिर सांगली निर्मित ब्लॅक कॉमेडी नाटक “दिनकर पुरोहित च काय झाले”
गुरुवार दि. 30 रोजी सकाळी 7.30 वाजता शतचंडी पाठ वाचन, सायं 4.00 वा. श्रींचे ग्रामदेवता भेटीसाठी प्रस्थान आणि श्रींचा ग्रामदेवता भेट सोहळा, सायं 6.30 वा. श्रींची पाद्यपूजा, औंक्षण, गोंधळ, आरती मंत्रपुष्पांजली व प्रसाद, रात्रौ 9.30 वा. दुर्गा स्तवन, रात्रौ 10.30 वा. सुमुखी परफॉमिंग आट् र्स फाऊंडेशन नृत्य आराधना सादर करणार आहे.
शुक्रवार दि. 01मे रोजी सकाळी 7.30 वाजता शतचंडी हवन पूर्णाहूती, दुपारी 12.30 ते 2.00 वाजता महाप्रसाद, दुपारी 3.30 ते 5.30 वाजता श्रींचे महावस्रांचा लिलाव. Anniversary celebration of Shri Durga Devi
