• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 April 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा वर्धापन दिन

by Guhagar News
April 16, 2026
in Guhagar
44 0
0
Anniversary of the Disabled Rehabilitation Institute
86
SHARES
247
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

24 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

गुहागर, ता. 16 : सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी कार्यरत असणारी रत्नागिरी जिल्ह्यातील शासनमान्य गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था ही गेली 24 वर्ष सतत दिव्यांगांसाठी कार्यरत आहे. या संस्थेचा 24 वा वर्धापन दिन बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता संस्थेचे कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा तालुका गुहागर येथे मोठ्या उत्साहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute

या कार्यक्रमाचे औचित्य साधून दिव्यांगांसाठी तसेच विधवा, विधुर व घटस्फोटीत व्यक्तींसाठी राज्यस्तरीय वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन  करण्यात आलेले आहे. तसेच दिव्यांगांना व दिव्यांग संस्थेला सर्वतोपरी मदत करणाऱ्या व्यक्तींना दिव्यांग साथी व दिव्यांग मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत.

यावर्षी या  पुरस्काराचे मानकरी श्री. सत्यवान प्रभाकर घाडे (पत्रकार दैनिक तरुण भारत गुहागर प्रतिनिधी) यांना दिव्यांग साथी तर श्री विनायक तुकाराम जाधव (सहाय्यक शिक्षक श्री देव गोपाळ कृष्ण विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर) यांना दिव्यांग मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दिव्यांगत्वावर मात करून स्वतःचा व कुटुंबाचा आर्थिक विकास करून दिव्यांगांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या श्री अनंत दत्तराम पालकर गाव पालपेणे तालुका गुहागर यांना स्वयंसिद्ध पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute

याच कार्यक्रमांमध्ये नासा व इस्त्रो मध्ये निवड झालेल्या  गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच गरजू दिव्यांगांना संस्थेच्या वतीने कृत्रिम साहित्याचे वाटपही करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे संस्थेच्या निधी संकलन उपक्रमात विशेष उल्लेखनीय निधी संकलन केलेल्या प्रथम तीन विद्यार्थी शाळा व केंद्र यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

दुसऱ्या सत्रात दरवर्षीप्रमाणे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे. तसेच सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी फनी गेम व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलेले आहे.

तरी दिव्यांगांनी दिव्यांगांसाठी चालविलेल्या या सेवाभावी संस्थेच्या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारच्या दिव्यांगांनी तसेच संस्थेचे सल्लागार, हितचिंतक व समाजातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून दिव्यांगांना प्रोत्साहित करावे. तसेच आपल्या ओळखीतल्या किंवा घराजवळपास राहत असलेल्या दिव्यांगांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री उदय रावणंग यांनी केलेले आहे. Anniversary of the Disabled Rehabilitation Institute

Tags: Anniversary of the Disabled Rehabilitation InstituteGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share34SendTweet22
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.