जीवन शिक्षण शाळेचा विद्यार्थी तालुक्यात प्रथम, जिल्हात आठवा तर राज्यात सोळावा
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील जीवन शिक्षण शाळा नंबर १ या शाळेतील विद्यार्थी अनय कानडे याने राज्यस्तरीय मंथन परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. या विद्यार्थीने मंथन परिक्षेत 300 पैकी 276 गुण मिळवून राज्यात 16 वा, जिल्ह्यात 8 वा तर तालुक्यात व शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. Anay Kanade Achieves Success in Manthan Exam
जिल्हा परिषद जीवन शिक्षण शाळा नंबर १ या शाळेतील कु. अनय कानडे हा इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे. या यशस्वी विद्यार्थांचे मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच कु. अनय कानडे याला पुढील वाटचालीस मनपुर्वक भरभरुन शुभेच्छा दिल्या. Anay Kanade Achieves Success in Manthan Exam
