• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 April 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अमेरिका चीन शीतयुद्धाचा नवा अध्याय

by Guhagar News
April 15, 2026
in Articals
58 0
0
113
SHARES
323
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पर्शियन गल्फचे अमेरिकन ब्लॉकेड, होर्मुझ ते मलाक्का स्ट्रेट!

विनय जोशी
Guhagar news : गेले ४५ दिवस इराणने बंद केलेली होर्मुझ स्ट्रेट उघडली जाण्याची काही चिन्हं दिसत नाहीत, ट्रम्पने दिलेल्या सगळ्या धमक्या पचवून इराण अजूनही त्यावर आपली घट्ट पकड ठेवून आहे. अमेरिका, इराण वाटाघाटी निष्फळ ठरलेल्या आहेत. आणि आता यावर ट्रम्पने काढलेला नवा उपाय जागतिक चिंतेचा विषय झालेला आहे. New Chapter in the US-China Cold War

होर्मुझ ब्लॉकेडचे अमेरिकन ब्लॉकेड!

वाटाघाटी निष्फळ झाल्यानंतर ट्रम्पने जागतिक इराणी तेल व्यापाराचा गळा दाबण्याचा निर्णय घेतला आहे. गेली कित्येक वर्षे इराणी क्रूड विक्रीवर अमेरिकन प्रतिबंध होते. त्यामुळे ९०% इराणी क्रूड एकटा चीन खरेदी करत होता आणि अजूनही करत आहे. याच्या वाहतुकीसाठी चीन “घोस्ट फ्लीट” म्हणजे थोडक्यात निनावी जहाजे वापरतो, त्यातून भर समुद्रात एका जहाजातून दुसऱ्या जहाजात क्रूड भरले जाते आणि घोस्ट फ्लीट जहाज नवीन क्रूड भरायला परत येतं. इराण युद्ध सुरू झाल्यावर इराणने होर्मुझ बंद केल्याने अरबी क्रूड व्यापार ठप्प झाला त्यामुळे जागतिक तेल बाजारात क्रूड किंमती अती वाढू नयेत म्हणून अमेरिकेने इराणी आणि रशियन क्रूड व्यापारातील निर्बंध काही महिनासाठी उठवले आहेत. यामुळे इराण, युद्ध सुरू होण्यापूर्वी ज्या दराने क्रूड विकत होतं त्यापेक्षा कित्येक जास्त दराने आता विकत आहे. याचा जास्त फायदा चीन उठवत आहे. New Chapter in the US-China Cold War

युद्ध सुरू झालं तेव्हा एक सिद्धांत असा मांडला जात होता की, चिनी अर्थव्यवस्थेला कोंडीत पकडण्यासाठी अमेरिका इराणवर हल्ले करत आहे. आता इराणने बंद केलेली होर्मुझ उघडता येईना आणि त्यातून इराण मात्र आपलं क्रूड चीनसह काही देशांना विकून चिक्कार पैसे कमावतो आहे. यामुळे चिडून जाऊन अमेरिकेने होर्मुझच्या बाहेर पडणाऱ्या इराणी जहाजांना रोखून इराणची आर्थिक नाकेबंदी करण्याची सुरुवात केली आहे. यामुळे चिनी क्रूड पुरवठ्यावर मोठे परिणाम होणार आहेत. New Chapter in the US-China Cold War

चीनची प्रतिक्रिया…

होर्मुझच्या नाकेबंदीची अमेरिकन नाकेबंदी ही चीन आणि इराणच्या द्विपक्षीय करारांच्या मध्ये अडसर निर्माण करत आहे आणि याविरोधात आम्ही पावले उचलू अशी चिनी रक्षा मंत्रालयाने धमकी दिली आहे. चीन क्रूड साठी पूर्णपणे इराण आणि रशियावर अवलंबून आहेत. यापैकी कोणताही एक स्रोत बंद झाला तर चिनी अर्थव्यवस्था अडचणीत येते. त्यामुळे इराणी जहाजे आणि इराणी तेल घेऊन जाणारी कोणतीही जहाजे अमेरिकेने अडवल्यास चीन त्याचा विरोध करणार हे चीनने उघड उघड जाहीर केलेलं आहे. New Chapter in the US-China Cold War

स्विफ्ट प्रतिबंध, चिनी चलन आणि होर्मुझचा टोल!

गेल्या दीड महिन्यात कित्येक जहाजांना इराणी सैन्याने पैसे आकारून होर्मुझ पार करू दिल्याच्या बातम्या आहेत, याबदल्यात इराण २ दशलक्ष डॉलर्स टोल आकारते आणि तो चिनी चलन रेनमीनबी/ युआन मध्ये घेते अशाही बातम्या आहेत. त्याशिवाय इराण आणि चीनमधील सर्व व्यापार हा डॉलर व्यवस्थेला धुडकावून थेट चिनी चलनात होतो. याबाहेर इराणचे होणारे आर्थिक व्यवहार आर्थिक निर्बंधांमुळे अमेरिकन आंतरराष्ट्रीय पेमेंट गेटवे “स्विफ्ट” मधून करता येत नाहीत, त्यामुळे ते व्यवहार सुद्धा चिनी युआन मधून होतात. यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय चलन म्हणून असलेल्या डॉलरच्या स्थानाला धक्का बसतो. आणि चिनी पर्यायामुळे अमेरिकन निर्बंधांची धार कमी होते. सगळ्याच्या राग आता अमेरिका उत्तर अरबी समुद्रात होर्मुझच्या बाहेर नवीन नौसैनिक नाकेबंदी करून काढत आहे. पण अमेरिका एवढ्यावर थांबत नाही, आता ट्रम्प सरकार चीनची अजून एक दुखरी नस दाबण्याचा प्रयत्नात आहे ती आहे मलाक्का स्ट्रेट… New Chapter in the US-China Cold War

अमेरिकन सैन्याची नाजूक बाजू, चीनची “तैवान विलीनीकरण योजना” आणि अमेरिकेची मलाक्का स्ट्रेट मधील घेराबंदीची तयारी…

इराण युद्ध सुरू झाल्यापासून चीनने इराणला आपल्या “बैदौ” सैनिकी संचार सॅटेलाईट्सच्या सेवा दिल्याचा अमेरिकन आणि इस्रायली एजन्सीना संशय आहे. यामुळे इराणी मिसाईल हल्ल्यांची अचूकता कमालीची वाढल्याचे पुरावे आहेत. शिवाय इराणी स्वस्त तेलाने चीनचा मोठा फायदा झालेला आहे आणि चिनी तेल खरेदीमुळे इराणी अर्थव्यवस्था आणि मिसाईल, ड्रोन कार्यक्रम फोफावला आहे. यामुळे अमेरिका आता चिनी अर्थव्यवस्थेचं नाक दाबण्याचे विविध मार्ग शोधत आहे. चीनने युद्ध सुरू झाल्यावरही इराणला सोडियम पर्क्लोरेट हे मिसाईल इंधन मोठ्या प्रमाणात पुरवलं आहे, यामुळे इराणी मिसाईल उत्पादन भर युद्धातही सुरळीत सुरू आहे. New Chapter in the US-China Cold War

या युद्धाच्या पहिल्या फेरीच्या ३८ दिवसात अमेरिकन सैन्य उत्पादनाची खर्चिक आणि संथ प्रक्रिया उघडी पडली आहे. विशेषतः अचूक हल्ला करणारी टॉमहोक मिसाईल आणि थाड आणि पॅट्रियट एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम यांचे इराणमुळे संपलेले साठे परत पूर्वीच्या स्थितीत येण्यासाठी काही वर्षं खर्ची पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर जर अमेरिकन सैन्याच्या या मर्यादा डोळ्यासमोर ठेऊन चीनने तैवानवर आपली नजर वळवली तर अमेरिकेसमोर बिकट संकट उभं राहील. यामुळे अमेरिका आता चीनला वेगळ्या सापळ्यात फसवण्याच्या योजनेवर विचार करत आहे.

चीनची दुखरी नस- मलाक्का स्ट्रेट…

एका बाजूला चीनचा इराणी क्रूड पुरवठा दाबायचा आणि दुसरीकडे चीनकडे जाणारा मलाक्का स्ट्रेट वाला क्रूड वाहतूक नाका बंद करायचा यावर अमेरिका काम करत आहे. मलाक्का स्ट्रेट ही मलेशिया आणि इंडोनेशिया मधून जाणारी चिंचोळी सामुद्रधुनी आहे. यातून चीनचा ७०% क्रूड पुरवठा मार्गस्थ होतो. मलाक्काच्या तोंडावर भारताने इंडोनेशियाचं सबांग बंदर वापरायला घेतल्याने भविष्यात युद्धकाळात चीन पाकिस्तान युती झाल्यास मलाक्का मधून जाणारी चिनी क्रूड वाहतूक बेमुदत बंद करायची तयारी ठेवली आहे. New Chapter in the US-China Cold War

मलाक्काच्या तोंडावर भारतीय वायुसेना अधूनमधून लाईव्ह बॉम्बिंग एक्सरसाइझ करून चीनला योग्य संदेश देत राहते. १९९९ च्या कारगिल युद्धात चीनने पाकिस्तानसाठी युद्धात उतरण्याची तयारी सुरू करताच भारतीय नौसेनेने मलाक्काच्या तोंडावर आक्रमक हालचाली सुरू करताच चीनने माघार घेतली होती हे आपल्या लक्षात असेलच!

नेमक्या याच भागात काल मलेशियाने चीनकडे जाणारी “घोस्ट फ्लीट” मधील दोन जहाजे छापेमारी करून आपल्या ताब्यात घेतली. ही जहाजे चीनकडे जाणाऱ्या जहाजात तेल उतरवणार होती. चीन समोर मलेशिया इतका धोका पत्करणार नाही, त्यामुळे ही कारवाई अमेरिकन दबावात किंवा अमिषाला बळी पडून मलेशियाने केली आहे हे मानायला वाव आहे. त्याशिवाय इंडोनेशियाने अमेरिकन सैनिकी विमानांना देशावरून उडण्याची परवानगी दिल्याची घोषणा अमेरिकन रक्षा मंत्री हेग्सेथ याने केली आहे. याचा अर्थ यापुढील काळात अमेरिका मलाक्का प्रेशर पॉईंटवर दाब देऊन चीनला नामोहरम करण्याचा प्रयत्न करणार. New Chapter in the US-China Cold War

चीनने तैवानवर आपला सैनिकी दबाव वाढवत नेला आहे आणि नुकताच तैवानी विरोधी पक्ष नेत्रीने चीनचा दौरा केला आहे. शांततेच्या मार्गाने तैवान विलीनीकरण न झाल्यास चीन तैवानवर सैनिकी कारवाई करेल. अमेरिका तैवान रक्षा करारामुळे अमेरिकेला तैवानसाठी लढायची वेळ येईल तेव्हा इराणसमोर लढताना दमछाक झालेली अमेरिका कित्येक पटीने प्रबळ चीनसमोर टिकण्याची शक्यता नाही, त्यामुळे आणीबाणीच्या स्थितीत चीनचा इंधन पुरवठा दाबण्याशिवाय अमेरिकेसमोर पर्याय नाही.

यासाठी अमेरिका होर्मुझ ते मलाक्का स्ट्रेट अशा विविध आघाड्यांवर आपले उपाय वापरण्याची तयारी करताना दिसत आहे. येणाऱ्या काळात हे अमेरिका चीन शीतयुद्ध भारताच्या अगदी जवळ येऊन पोचणार आहे. इराण युद्धाच्या सुरुवातीपासून अमेरिकन लक्ष इराणपेक्षा सुद्धा जास्त चीनची इंधन कोंडी करणं हे होतं, फक्त इराणने अत्यंत हुशारीने इराणची मित्र राष्ट्रे वगळून अन्य सर्वांसाठी होर्मुझ बंद केल्याने अमेरिकेला मलाक्का आघाडी उघडण्याची गरज भासली!

आगामी काळात चीन तैवान विलीनीकरणासाठी किती घाई करतो यावर मलाक्का आघाडी किती गरम होते ते अवलंबून आहे, या धामधुमीच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी अंदमान निकोबार युनिफाइड कमांड वेगाने मजबूत करणं तातडीची गरज बनली आहे हे मात्र नक्की! New Chapter in the US-China Cold War

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNew Chapter in the US-China Cold WarNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share45SendTweet28
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.