• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 April 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली येथील शिक्षकाचा मनमानी कारभार

by Guhagar News
April 11, 2026
in Guhagar
38 0
0
Teacher's arbitrary behavior
74
SHARES
212
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

निलंबनाऐवजी बदलीवर काढल्याने संताप

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील जि.प. पू. प्रा. मराठी शाळा तळवली नं. १ येथील शिक्षक श्री. एकनाथ जावरे यांच्या वर्तनाविरोधात पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. गंभीर आरोपांनंतरही ठोस निलंबनात्मक कारवाई न होता केवळ बदली करण्यात आल्याने शिक्षण विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Teacher’s arbitrary behavior

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकावर वारंवार उशिरा शाळेत येणे, अध्यापनाकडे दुर्लक्ष करणे, तसेच पालक व ग्रामस्थांशी अरेरावीची भाषा वापरणे असे आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय “अधिकारी माझ्या खिशात आहेत”, “ते माझ्या शाळेत यायला दहा वेळा विचार करतात” अशी वक्तव्ये करून अप्रत्यक्ष धमकी दिल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. Teacher’s arbitrary behavior

३० मार्च २०२६ रोजी पोषण आहार शिजविणाऱ्या महिलेशी वाद घालताना शिक्षकाने अत्यंत आक्रमक वर्तन केल्याचे समोर आले आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर व ग्रामस्थांसमोर धक्कादायक वक्तव्य केल्याने शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीतही संबंधित शिक्षकाने उद्धट वर्तन केल्याचा आरोप असून, अधिकृत प्रोसिडिंग लिहिण्यास नकार देणे तसेच सहाय्यक शिक्षिकेवर दबाव टाकल्याचीही माहिती समोर आली आहे. पालकांनी लेखी माफीची मागणी केली असता त्यांनी ती नाकारल्याचे सांगितले जाते. Teacher’s arbitrary behavior

या संपूर्ण प्रकारानंतर संतप्त पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला असून, गटशिक्षण अधिकारी व पंचायत समिती प्रशासनाकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली होती. मात्र संबंधित शिक्षकाने लेखी स्पष्टीकरण देण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. तरीही त्यांच्या वर्तनात कोणताही बदल न झाल्याने पालकांचा संताप अधिकच वाढला आहे. Teacher’s arbitrary behavior

या शिक्षकावर यापूर्वीही कारवाई झाल्याची माहिती असतानाही सध्याच्या गंभीर प्रकरणात निलंबनाऐवजी केवळ बदली करण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Teacher’s arbitrary behavior

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTeacher's arbitrary behaviorटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share30SendTweet19
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.