• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 April 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

परशुराम कॉलेज, वेळणेश्वर येथे “ETTS 2026” राष्ट्रीय परिषद

by Guhagar News
April 10, 2026
in Guhagar
21 0
0
National Conference at Parshuram College, Velneshwar
41
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 10 : विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचलित महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वर येथे National Center for Science Communicators (NCSC), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ व ८ एप्रिल २०२६ रोजी “Emerging Trends in Technology & Science 2026” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे भव्य आणि यशस्वी आयोजन करण्यात आले. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, शाश्वत ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बहु विद्याशाखीय संशोधन या क्षेत्रांतील नव्या प्रवाहांवर केंद्रित असलेल्या या परिषदेला विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, तज्ज्ञ आणि विज्ञानप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानातील नव्या संधींची ओळख करून देणे, संशोधन संस्कृतीला चालना देणे आणि नवोपक्रमशील विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. National Conference at Parshuram College, Velneshwar

परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी NCSC, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास नाईक-साटम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात “विज्ञान व तंत्रज्ञानाच्या शाश्वत विकासासाठी नावीन्यपूर्ण संशोधन  हाच एकमेव प्रभावी उपाय आहे” असे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञान आत्मसात न करता समाजोपयोगी संशोधन आणि तंत्रज्ञान विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. तसेच  ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुधाकर आगरकर यांनी परिषद ही केवळ शोधनिबंध सादरीकरणाची संधी नसून शिकण्याची, विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक वातावरणाशी जोडण्याची सुवर्णसंधी असल्याचे नमूद केले. अप्लाइड सायन्स अँड ह्यूम्यानीटीझ  विभागाचे विभागप्रमुख डॉ. गणेश दिवे यांनी नवोपक्रम आणि बहुविषयक दृष्टिकोन यांच्या माध्यमातून सध्याच्या सामाजिक, तांत्रिक आणि पर्यावरणीय समस्यांवर परिणामकारक उपाय शोधता येतील, असे मत व्यक्त केले. National Conference at Parshuram College, Velneshwar

या राष्ट्रीय परिषदेमध्ये  विविध विषयांवरील पाच उच्च दर्जाची व्याख्याने आयोजित करण्यात आली. सर्वप्रथम डॉ. सिद्धिविनायक बर्वे यांनी “Emerging Trends in Science and Technology: Challenges & Opportunities” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी औद्योगिक क्रांतीपासून Industry 4.0 आणि Industry 5.0 पर्यंतचा प्रवास स्पष्ट करताना, या नव्या तांत्रिक लाटेमुळे मानवी जीवन, उद्योग, उत्पादन व्यवस्था आणि रोजगाराच्या संधींमध्ये कसे परिवर्तन होत आहे याचे प्रभावी विश्लेषण केले. National Conference at Parshuram College, Velneshwar

डॉ. सुधाकर आगरकर यांनी “Developing Multimodal E-content in STEM: Some Experiences” या विषयावर बोलताना STEM शिक्षणातील डिजिटल साधनांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी संवर्धित वास्तव (AR), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई-कंटेंट विकास आणि मल्टिमोडल शिक्षण पद्धती यांमुळे अध्यापन प्रक्रिया अधिक परिणामकारक, विद्यार्थीकेंद्री आणि अनुभवाधारित कशी होत आहे याची उदाहरणांसह मांडणी केली. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही तंत्रज्ञानाधारित अध्यापन पद्धती अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. National Conference at Parshuram College, Velneshwar

तिसऱ्या व्याख्यानात डॉ. चंद्रशेखर मराठे यांनी “Physical Science and Engineering” या विषयावर भाष्य केले. त्यांनी विज्ञानातील सैद्धांतिक संकल्पना आणि अभियांत्रिकीतील प्रत्यक्ष उपयोग यांच्यातील संबंध स्पष्ट करताना नावीन्यपूर्ण संशोधनाच्या  माध्यमातून सिद्धांतांचे व्यावहारिक अनुप्रयोगात रूपांतर झाले तरच विज्ञानाचा खरा लाभ समाजाला मिळतो असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि प्रकल्पाधारित शिक्षणावर भर द्यावा, असे त्यांनी प्रतिपादन केले. National Conference at Parshuram College, Velneshwar

डॉ. नरेंद्र देशमुख यांनी “Emerging Technologies in Education” या विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या शिक्षण व्यवस्थेत AR, AI, स्मार्ट कंटेंट, अ‍ॅडॅप्टिव लर्निंग आणि डिजिटल मूल्यमापन यांचे महत्त्व स्पष्ट करताना शिक्षकांना वर्गखोल्यांमध्ये या तंत्रज्ञानांचा वापर करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी उपयुक्त उपाय  सांगितले. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा संतुलित आणि विद्यार्थीकेंद्रित वापर केल्यास गुणवत्तापूर्ण शिक्षण शक्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पाचव्या आणि अत्यंत महत्त्वपूर्ण व्याख्यानात डॉ. भोलानाथ मुखर्जी यांनी “Emerging Technologies in Sustainable Energy: Shaping a Green Future” या विषयावर शाश्वत ऊर्जा क्षेत्रातील नवीन घडामोडी मांडल्या. त्यांनी हायड्रोजन ऊर्जा ही जागतिक ऊर्जा समस्येवरील भविष्यकालीन प्रभावी उपाय असल्याचे सांगितले. हरित ऊर्जा, कार्बन कमीकरण, पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा स्वावलंबन या दृष्टीने संशोधनाच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. National Conference at Parshuram College, Velneshwar

परिषदेत एकूण ८३ संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विज्ञान, अभियांत्रिकी, शिक्षण, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाशी संबंधित विषयांवर ४४ संशोधन निबंध सादर करण्यात आले. या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी आपल्या अभिनव कल्पना, प्रयोगाधारित निष्कर्ष, तांत्रिक मॉडेल्स आणि सामाजिक उपयोगितेवर आधारित उपाय प्रभावीपणे मांडले. या संशोधन सादरीकरणांमुळे परिषदेत उत्साही आणि संशोधनाभिमुख वातावरण निर्माण झाले. परिषदेला अधिक शैक्षणिक महत्त्व प्राप्त करून देणारी बाब म्हणजे, सादर झालेले निवडक संशोधन निबंध peer-reviewed journal मध्ये प्रकाशित होणार आहेत. यामुळे सहभागी संशोधकांना राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक ओळख मिळण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांमध्ये दर्जेदार संशोधनाची प्रेरणा निर्माण झाली आहे. National Conference at Parshuram College, Velneshwar

समारोप समारंभात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांनी परिषद आपले उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात यशस्वी ठरल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि संशोधन क्षमतांच्या विकासासाठी अशा राष्ट्रीय स्तरावरील संधी भविष्यातही सातत्याने उपलब्ध करून देण्यास महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व जागतिक शैक्षणिक प्रवाहाशी जोडण्याच्या दृष्टीने अशा परिषदांचे महत्त्व त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले.

परिषदेच्या शेवटी प्रा. राहुल कुंडिया यांनी आभार प्रदर्शन करताना विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, प्राचार्य डॉ. अविनाश पवार, प्रमुख पाहुणे श्री. सुहास नाईक-साटम, वक्ते, विभागप्रमुख, R&D Cell, आयोजन समिती, सहभागी प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. National Conference at Parshuram College, Velneshwar

ही परिषद महाविद्यालयातील संशोधन संस्कृती, वैज्ञानिक दृष्टिकोन, बहुविषयक शिक्षण आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी असलेल्या संस्थेच्या दृढ बांधिलकीचे प्रभावी प्रतीक ठरली. विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नव्या दिशा, उद्योगक्षेत्रातील संधी, डिजिटल शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या संकल्पना समजून घेण्यासाठी ही परिषद अत्यंत उपयुक्त ठरली. एकंदरीत ही राष्ट्रीय परिषद महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा म्हणून नोंदवली गेली. या परिषदेच्या आयोजनामध्ये प्रा. दांडेकर, प्रा. कुंडिया, प्रा. साळुंखे, प्रा. पाटकर, प्रा. जोशी, प्रा. देव, श्री. लोहार व श्री. रहाटे यांनी विशेष मेहनत घेतली. National Conference at Parshuram College, Velneshwar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNational Conference at Parshuram CollegeNews in GuhagarVelneshwarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.