• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 April 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूणमध्ये ‘जनगणना २०२७’ फील्ड ट्रेनर्स प्रशिक्षण

by Guhagar News
April 8, 2026
in Ratnagiri
27 0
0
Training of 'Census 2027' Field Trainers
53
SHARES
151
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

​देशातील पहिली ‘डिजिटल’ जनगणना; मोबाईल ॲप आणि पोर्टलद्वारे होणार माहिती संकलन

​रत्नागिरी, ता. 08 : देशातील सोळाव्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या आठव्या जनगणनेची प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने वेग घेऊ लागली आहे. जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून चिपळूण पंचायत समितीमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात फील्ड ट्रेनर्ससाठी आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन सोमवारी झाले. Training of ‘Census 2027’ Field Trainers

प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मास्टर ट्रेनर म्हणून मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे व राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे उपस्थित होते. तसेच जनगणना समन्वय अधिकारी संजीव गावकर, सहाय्यक महसूल अधिकारी संभाजी ढेंबरे आणि तांत्रिक सहाय्यक अमोल करंडे यांनीही या सत्राला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. Training of ‘Census 2027’ Field Trainers

Training of 'Census 2027' Field Trainers

​​यंदाच्या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असणार आहे. प्रशिक्षणादरम्यान फील्ड ट्रेनर्सना
​मोबाईल ॲपचा वापर: प्रगणक प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन ॲपद्वारे माहिती कशी नोंदवतील.
​प्रश्नांची हाताळणी: नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या ३३ प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवण्यासाठीचे कौशल्य.
​CMMS पोर्टल: संपूर्ण माहिती संकलनाचे नियंत्रण या पोर्टलद्वारे केले जाणार आहे.
​​जनगणना २०२७ ही दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा ‘घरयादी व घरगणना’ तर दुसरा टप्पा ‘लोकसंख्या गणना’ हा असेल.
१ मे ते १५ मे २०२६ नागरिकांना ‘स्वगणनेची’ (Self-Enumeration) सुविधा.
१६ मे ते १४ जून २०२६ प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार.

​”यंदा प्रथमच जातनिहाय माहिती संकलित केली जाणार असून, डिजिटल माध्यमामुळे ही प्रक्रिया अधिक अचूक, जलद आणि पारदर्शक होईल. शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, फील्ड ट्रेनर्सच्या माध्यमातून त्यांना सक्षम केले जात आहे.”  Training of ‘Census 2027’ Field Trainers

​प्रगणक म्हणून शिक्षकांची जबाबदारी ​
जिल्हास्तरावर सुरू असलेल्या या प्रशिक्षण साखळीत आता फील्ड ट्रेनर्स तयार केले जात आहेत. हे ट्रेनर्स पुढे प्रगणक (Enumerators) आणि पर्यवेक्षकांना (Supervisors) प्रशिक्षित करतील. या प्रक्रियेत प्रामुख्याने शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, ते प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलनाचे काम करणार आहेत. या प्रशिक्षणामुळे आगामी जनगणनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. Training of ‘Census 2027’ Field Trainers

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTraining of 'Census 2027' Field Trainersटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share21SendTweet13
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.