पतसंस्थेला २० कोटी ६२ लाख लाख ढोबळ नफा
गुहागर, ता. 06 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेला आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२६ अखेर रूपये २० कोटी ६२ लाख ढोबळ नफा झाला असून आवश्यक त्या सर्व तरतुदी नंतर रुपये ०९ कोटी २१ लाख निव्वळ नफा झाला. तसेच संस्थेने रू.५०० कोटी एकत्रित व्यवसायाचे लक्ष्य साध्य केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा.श्री. प्रभाकर आरेकर यांनी दिली. संस्थेच्या कोकण विभाग कार्यक्षेत्रात २२ शाखा व ०२ कलेक्शन सेंटर कार्यरत आहेत. संस्थेने शाखा विस्ताराचे धोरण स्विकारले असून चालू आर्थिक वर्षात पाच नवीन शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मा.श्री प्रभाकर आरेकर यांनी यावेळी बोलताना दिली. Balance Sheet of Shri Samarth Bhandari Credit Union
संस्थेने विश्वासार्हता, पारदर्शकता,सुरक्षितता व व्यावसायिकता यानुसार नियोजनबध्द कामकाज केल्यामुळे तसेच संस्थेचे सभासद व ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांनी संस्थेवर दाखविलेला विश्वास व निरंतर सहकार्य यामुळेच संस्थेने या आर्थिक वर्षात विक्रमी नफा मिळविला आहे. दिनांक ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेच्या एकुण ठेवी रु.२७५ कोटी २३ लाख झाल्या असून ठेवींमध्ये ५६ कोटी १९ लाखांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे संस्थेचा एकुण कर्जव्यवहार रु.२२९ कोटी ३७ लाख असून कर्ज व्यवहारामध्ये रू. ५३ कोटी १९ लाख वाढ झाली आहे. दिनांक ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेचे वसुल भागभांडवल रु.१३ कोटी, निधी २३ कोटी १७ लाख, गुंतवणूका रु.१०८ कोटी ५० लाख तसेच संस्थेचे खेळते भांडवल रु.३४८ कोटी ४३ लाख झाले आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय ५०४ कोटी ६० लाख असून त्यामध्ये गतवर्षीपेक्षा रूपये १०९ कोटी ३८ लाख वाढ झालेली आहे. Balance Sheet of Shri Samarth Bhandari Credit Union
संस्थेचे एकुण कर्जव्यवहारामध्ये सोनेतारण व स्थावर तारण कर्जासारख्या सुरक्षित कर्जाचे प्रमाण सर्वाधिक असून योग्यप्रकारे कर्ज वितरण व नियोजनबध्द वसुली यामुळे संस्थेच्या थकबाकीचे एकुण कर्जाशी प्रमाण केवळ ०.१० % इतके आहे तसेच संस्थेच्या नेट एनपीओ चे प्रमाण शुन्य टक्के राखलेले आहे. संस्थेचा सी.डी.रेश्यो ६८.२१% असून आवश्यक त्या सर्व निकषांचे संस्थेने काटेकोरपणे पालन केलेले आहे. Balance Sheet of Shri Samarth Bhandari Credit Union
संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असून सर्व शाखांमध्ये बँकिंगच्या बहुतांश सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संस्थेने सातत्याने केलेल्या प्रगतीमध्ये व मिळालेल्या यशामागे संस्थेचे संचालक मंडळातील सहकारी,कर्मचारी वर्ग तसेच सभासद, ठेवीदार, ग्राहक तसेच हितचिंतक यांचे मोलाचे योगदान असल्याचे संस्थापक, अध्यक्ष मा.श्री. प्रभाकर आरेकर यांनी नमूद केले. Balance Sheet of Shri Samarth Bhandari Credit Union
