• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 April 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाराष्ट्राची अत्याधुनिक आरोग्य यंत्रणा

by Guhagar News
April 4, 2026
in Maharashtra
22 0
0
43
SHARES
123
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

Guhagar news : भारताच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन मानले जाणारा महाराष्ट्र आता पायाभूत सुविधांच्या विकासाच्या पलीकडे जाऊन सर्वांगीण विकासाचा सर्वोच्च टप्पा असलेल्या ‘आरोग्य सेवा’ आणि ‘जागतिक दर्जाची उद्योग संस्कृती’ यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडलेली ‘PULSE 2026’ (Promoting Universal Learning, Systems, and Excellence) ही शिखर परिषद या परिवर्तनाचा पाया ठरत आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या ध्येयाकडे पाऊल टाकताना, राज्य सरकारने आरोग्य आणि उद्योग क्षेत्राला एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून समोर आणले आहे. Maharashtra’s State-of-the-Art Healthcare System

भविष्यातील आरोग्य सेवेची सामायिक संकल्पना

राज्याच्या उच्च नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली ‘सह-संकल्पन’ (Co-design) या बाबीवरील भर हे PULSE 2026 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. आरोग्य सेवेकडे केवळ राज्य शासनाची सामाजिक जबाबदारी न मानता त्या आर्थिक संशोधनाचा कणा देखील ठराव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि खाजगी क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती या परिषदेद्वारे एकत्र आल्या. अशा सह-संकल्पन आधारित सहकार्यामुळे सर्वसामान्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणे शक्य होईल, हे या परिषदेने अधोरेखित केले.

वैद्यकीय शिक्षणाचे ‘डिजिटल’ पुनरुत्थान

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगाला अनुरूप महाराष्ट्र ‘क्षमता-आधारित वैद्यकीय शिक्षण’ (CBME:Competency-Based Medical Education (CBME) पद्धतीचा अवलंब करत आहे. यामध्ये, डॉक्टराना बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचे कौशल्य शिकवले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी: वर्गांमधील शिक्षणापासून ते प्रत्यक्ष शस्त्रक्रियेपर्यंत AI चा वापर अनिवार्य केला जात आहे. ‘व्हर्च्युअल हॉस्पिटल’ आणि ‘डिजिटल ट्विन’ तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष रुग्णावर उपचार करण्यापूर्वी डॉक्टर गुंतागुंतीच्या परिस्थितीचा सराव करू शकतील. Maharashtra’s State-of-the-Art Healthcare System

राज्याने आपले शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी लीड्स युनिव्हर्सिटी आणि रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स (ग्लासगो) सारख्या नामवंत जागतिक संस्थांशी संलग्नता साधली आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी जागतिक दर्जाचे संशोधक म्हणून घडतील.

मेडिकल टुरिझम द्वारा राज्याच्या तिजोरीला बळकटी

आरोग्य सेवा रोजगाराचे मोठे साधन बनली आहे. मेडिकल टुरिझम द्वारे महाराष्ट्र जगभरातील रुग्णांना आकर्षित करत आहे. त्यामुळे रुग्णालयांचा विकास तर होत आहेच, पण हॉटेल व्यवसाय, वाहतूक आणि स्थानिक तंत्रज्ञान क्षेत्रालाही मोठी चालना मिळत आहे. पारंपारिक भारतीय वैद्यकीय ज्ञान आणि आधुनिक पाश्चात्य तंत्रज्ञान यांची सांगड घालून एक ‘हायब्रीड आरोग्य परिसंस्था’ निर्माण करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. Maharashtra’s State-of-the-Art Healthcare System

उद्योजकांसाठी महाराष्ट्र हे नंदनवन ठरावे, यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात अडथळे दूर केले आहेत. ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’ अंतर्गत झालेली सर्वात मोठी सुधारणा म्हणजे परवानग्यांची संख्या ३३ वरून थेट १३ वर आणणे.

यातील २० परवानग्या आता ‘स्वयं-प्रमाणन’ (Self-certification) तत्त्वावर चालतील. उद्योजकांना आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. ‘महाराष्ट्र जन विश्वास कायदा २०२५’ मुळे किरकोळ तांत्रिक चुकांसाठी होणारी फौजदारी कारवाई रद्द करण्यात आली असून, विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. Maharashtra’s State-of-the-Art Healthcare System

७२० कोटींची गुंतवणूक आणि ‘महाराष्ट्र घोषणापत्र’

PULSE 2026 चा समारोप होत असतानाच आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला अधिक बळ देण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष कृती देखील सुरु झाली. या परिषदेत १५ सामंजस्य करारांवर (MoUs) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून त्यातून ७२० कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित झाली आहे. यात ‘निप्रो फार्मापॅकेजिंग’ (२०० कोटी) आणि रायगडमधील बल्क ड्रग पार्कमधील ‘फार्माक्स’चा (४७० कोटी) प्रकल्प महत्त्वाचा आहे. परिषदेच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात आलेले ‘महाराष्ट्र घोषणापत्र’ हे पुढील १० वर्षांसाठी आरोग्य आणि उद्योग क्षेत्रातील परिवर्तनाचा नकाशा (Roadmap) ठरणार आहे.

१. तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता (Tele-Medicine & AI): ग्रामीण भागात अनेकदा तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासते. फडणवीस यांनी आरोग्य सेवेत AI आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा जो आग्रह धरला आहे, त्यामुळे आता पुण्या-मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर ‘व्हर्च्युअल क्लिनिक’च्या माध्यमातून ग्रामीण रुग्णांवर अचूक उपचार करू शकतील. ‘डिजिटल ट्विन’ तंत्रज्ञानामुळे ग्रामीण डॉक्टरांना क्लिष्ट शस्त्रक्रियांचे मार्गदर्शन मिळणे सोपे होईल. Maharashtra’s State-of-the-Art Healthcare System

२. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती: औद्योगिक परवानग्या ३३ वरून १३ वर आणल्यामुळे आणि वीज दरात कपात करण्याच्या निर्णयामुळे आता उद्योजक शहरांऐवजी ग्रामीण भागात, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील ‘बल्क ड्रग पार्क्स’ मध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळे ग्रामीण तरुणांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच सन्मानाचा रोजगार उपलब्ध होईल, परिणामी शहरांकडे होणारे स्थलांतर थांबेल.

३. पारंपारिक आणि आधुनिकतेचा संगम: भारतीय मूल्यांच्या समर्थानासह संवर्धनही तितकेच गरजेचे आ यामुळे ‘आयुष’ (Ayush) आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांची सांगड घातली जात आहे. याचा फायदा ग्रामीण भागातील नैसर्गिक उपचार पद्धतींना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी होईल. Maharashtra’s State-of-the-Art Healthcare System

४. आरोग्य विम्याचे कवच आणि सुलभता:

सरकारी योजनांची अंमलबजावणी ‘मैत्री पोर्टल’ प्रमाणे पारदर्शक केल्यामुळे, ग्रामीण रुग्णांना उपचारांसाठी कागदपत्रांच्या जंजाळात अडकावे लागणार नाही. “मानलेली मंजुरी” (Deemed Approval) सारखी तत्त्वे आता आरोग्य सेवांच्या वितरणातही शिस्त आणतील.

थोडक्यात, ‘PULSE 2026’ ही महाराष्ट्रातील आरोग्य सेवा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आखलेला हा विकासाचा आराखडा केवळ कागदावर न राहता, ७२० कोटींच्या गुंतवणुकीतून प्रत्यक्ष कृतीत उतरत आहे. पायाभूत सुविधांसोबतच आरोग्य आणि उद्योगाला दिलेली ही गती महाराष्ट्राला ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ बनवण्याच्या दिशेने पडलेले सर्वात आश्वासक पाऊल आहे. जेव्हा राज्याचे तंत्रज्ञान आणि ग्रामीण भागातील सामान्यांची गरज यांची एकात्मिक सांगड घातली जाते, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘विकसित महाराष्ट्र’ साकार होतो. हीच प्रगतीची नवी लाट २०४७ च्या समृद्ध भारताचे नेतृत्व करेल. Maharashtra’s State-of-the-Art Healthcare System

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMaharashtra's State-of-the-Art Healthcare SystemMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.