• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 March 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटण ते चिपळूण मार्ग वाहतुकीसाठी बंद

by Manoj Bavdhankar
March 28, 2026
in Guhagar
78 1
0
153
SHARES
438
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महामार्गाच्या कामामुळे वाहतूक मार्गात बदल

गुहागर, ता. 28 : कराड ते चिपळूण १६६ ई राष्ट्रीय महामार्ग या महामार्गावर पाटण शहरातील धांडे पुलाची पुर्नबांधणी आणि बाजारपेठेतील क्रॉक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कराड, उंब्रज व्हाया पाटण मार्गे चिपळूण येणारा रस्ता पुढील 2 महिने वहातुकीसाठी बंद रहाणार आहे. यामुळे नागरीकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होवू नये म्हणून महामार्ग प्राधिकरणद्वारे पर्यायी मार्गांची माहिती प्रसिध्द केली आहे. चिपळूण कराड रस्त्यावर जागोजागी माहितीचे फलक प्रसिध्द करण्यात आले असून पोलीसही वाहनचालकांना सूचना देण्याचे काम करत आहे. Patan-Chiplun Road closed.

तुषार दोशी, सातारा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयातून प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये पाटण शहरातून जाणारा कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ई वरील वाहतूक मार्गात बदल करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणेकरीता दि. २७ मार्च २०२६ चे ००.०१ ते २७ मे २०२६ चे २३.५९ वा. पर्यत खालील अधिसुचना पारित करीत केली आहे. Patan-Chiplun Road closed.

वाहतुक मार्गातील बदल

वाहतूक मार्गातील बदल खालीलप्रमाणे करण्यात आला आहे.

१. कराड व उंब्रज बाजुकडुन चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतुक :- कराड व उंब्रज येथून सरळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ०४ वरुन पाचवंड फाटा उंडाळे कोकरुड मलकापूर आंबा घाट संगमेश्वर वरुन चिपळूणकडे जाईल.

२. चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे येणारी अवजड वाहतुक :- चिपळूणवरुन संगमेश्वर आंबा घाट मलकापूर, कोकरुड, उंडाळे, पाचवड फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र. ०४ वरुन कराड, उंब्रज कडे जाईल.

३. कराड व उंब्रज बाजुकडुन चिपळूणकडे जाणारी सर्व हलकी वाहतुक :- कराड व उंब्रज येथुन नवारस्ता गव्हाणवाडी फाटा नेरळे गौंड येथुन कराड ते चिपळूण महार्गावरुन चिपळूणकडे जातील.

४. चिपळूणकडून कराड उंब्रजकडे येणारी सर्व हलकी वाहतूक :- चिपळूणकडून येणारी वाहतुक नेरळे गौंड, गव्हाणवाडी फाटा, नंवारस्ता मार्गे कराड व उंब्रजकडे जातील.

ही वाहतूक ज्या ज्या ठिकाणावरुन वळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहतूक मार्गात केलेल्या बदलांबाबत सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन भापोसे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे. Patan-Chiplun Road closed.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPatan-Chiplun Road closedटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share61SendTweet38
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.