अंजनवेलमधील घटना, रत्नागिरीत गुन्हा दाखल
गुहागर, 28 : Attack to Steal Gold Chain तालुक्यातील अंजनवेल येथे जेवण करून शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या गणपत दाजी कदम (रा. सड्येवाडी, वय 65) यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्याच्या गळयातील सोन्याची चेन आरोपीने चोरली. या घटनेत गंभीर झालेल्या गणपत कदम त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या संदर्भातील गुन्हा रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल करुन तो गुहागर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. गुहागर पोलीस २५ वर्षीय आरोपीचा शोध घेत आहेत.
Attack to Steal Gold Chain
गुहागर तालुक्यातील अंजनवेल सड्येवाडी गणपत दाजी कदम, पोलीसांना दिलेल्या माहितीनुसात 25 मार्च रोजी रात्री जेवणानंतर ते घरासमोरील रस्त्याने बाबु कडव यांच्या हॉटेलपर्यंत शतपावली करण्यासाठी गेले होते. रात्री ९.४५ च्या सुमारास त्यांना समोरुन चालत येणारा प्रतिक केरू डांगे (वय २५) भेटला. त्याने गणपत कदम यांना आपण बाबु कडव यांच्या हॉटेलपर्यंत जाऊन परत येवु असे सांगितले. आता रात्रीचे १०.१५ वाजल्याने मी परत घरी जातो असे सांगून कदम यांनी त्याच्याबरोबर येण्यास नकार दिला. तरीही प्रतिक डांगे याने आग्रह करून गणपत कदम यांना आपल्यासोबत बाबु कडव यांच्या हॉटेलपर्यंत चालत नेले. तेथून परत येत असताना प्रतिकने गणपत कदम यांच्या गळयात हात घालुन, गळा आवळून, गळयातील दोनी तोळयाची चैन ओढली. कदम यांना खाली पाडुन त्यांच्या डोक्यात व तोंडावर मारला. त्यानंतर कदम यांचा टी-शर्ट पकडून रस्त्यावरुन ओढत सड्येवाडी येथील बाबु कडव यांच्या हॉटेलच्या बाजुच्या रस्त्याजवळील झाडीत टाकले. Attack to Steal Gold Chain
यामध्ये फिर्यादी गणपत कदम गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रत्नागिरी येथे झीरो नंबरने तक्रार दाखल करून गुहागर पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रतिक डांगे यांच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३९२, ३०९ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Attack to Steal Gold Chain