• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 March 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खामशेत ग्रामपंचायत नळपाणी योजना श्री दत्तकृपा स्वयंसहाय्यता गट चालवणार

by Guhagar News
March 25, 2026
in Guhagar
35 1
1
Self-Help Groups to Operate Tap Water Scheme
70
SHARES
199
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 :  तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतने १०० टक्के घरपट्टी व नळपट्टी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तारखेला भरून आदर्श निर्माण केला आहे. खामशेत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक घरात पाणीपुरवठ्याचे नळ कनेक्शन देण्यात आले आहे. तर यावेळी जागतिक जलदिन निमित्ताने खामशेत गावाची नळपाणी पुरवठा योजना गावातीलच श्री दत्तकृपा स्वयंसहाय्यता महिला बचत गटाला देण्यात आली आहे. ही नळपाणी योजना आता महिला बचत गट चालवणार आहे. याद्वारे एकप्रकारे महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. Self-Help Groups to Operate Tap Water Scheme

यावेळी खामशेत गावातील पेवे खामशेत शाळा क्र ३ येथे जल महोत्सव साजरा करण्यासाठी खामशेत गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी व अधिकारी याच्या उपस्थितीत विहिरीचे पूजन करून विहिरीतील पाण्याने भरलेले कलश महिलांना डोक्यावरून आणून त्यांचे पूजन केले. त्यानंतर योजना बचत गटाकडे चालवण्यास देण्याचा करार बचत गटाला सुपूर्द करण्यात आला.  Self-Help Groups to Operate Tap Water Scheme

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी जल जीवन अंतर्गत घर घर नळ ही योजना पूर्ण झालेल्या खामशेत ग्रामपंचायतीकडे चर्चा करून ही नळयोजना स्वयंसहाय्यता महिला बचत गटाकडे सुपूर्द करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे खामशेत ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या खामशेत नळपाणी पुरवठा योजना श्री दत्तकृपा स्वयंसहाय्यता महिला बचत गटाकडे करार तत्वावर सोपवण्यात आली असून या योजनेचा संपूर्ण कार्यभार आता बचत गट पहाणार आहे. खामशेत ग्रामपचायतीअंतर्गत खामशेत व पारदळेवाडी अशा दोन नळपाणी पुरवठा योजना आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे ३५० नळ कनेक्शन असून खामशेत गावाची नळपाणी योजनेचे ११० नळ कनेक्शन आहेत. या योजनेची कराची वसुली, योजना सुरळीत सुरू ठेवणे, दुरुस्ती आदी संपूर्ण कामकाज खामशेत येथील श्री दत्तकृपा स्वयंसहाय्यता महिला बचत गट पाहणार आहे. Self-Help Groups to Operate Tap Water Scheme

जिल्हा परिषदेमार्फत यापूर्वी रत्नागिरी तालुक्यातील वळके मराठवाडी पाणी योजना, लांजा तालुक्यातील निवोशी इंदवटी पाणी पुरवठा योजना महिला बचतगटांकडे सोपवण्याचा क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला होता. जागतिक जलदिनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी विविध संकल्पना राबवण्यात आल्या आहेत. यामध्ये पाणी आणि लिंगभाव यावर आधारित यावर्षी जलदिन साजरा करण्यात आला. जास्तीत जास्त महिला व मुलीना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करणे हा मुख्य उद्देश यावेळी ठेवण्यात आला आहे. ८ मार्च ते २२ मार्च या कालावधीत जल महोत्सव साजरा करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने करण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे खामशेत गावात जलअर्पण दिवस साजरा करून ही योजना गावाकडे सुपूर्द करून स्वामीत्वाचा उत्सव साजरा करण्यात आला. Self-Help Groups to Operate Tap Water Scheme

यावेळी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती नीतेश सुर्वे, सदस्या उर्वी खैर, स्नेहा शिगवण, प्रशासक मंगेश सोलकर, कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, गटविकास अधिकारी परेश शिरसाट, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता दीप्ती धारप, विस्तार अधिकारी शरद मांड, ग्रामपंचायत अधिकारी रमेश मोहिरे, महिला बचत गटातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Self-Help Groups to Operate Tap Water Scheme

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSelf-Help Groups to Operate Tap Water Schemeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share28SendTweet18
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.