गुहागर, ता. 19 : देशातील मान्यवर साहित्य संस्थांपैकी एक असलेल्या साहित्य अकादमी तर्फे नवी दिल्ली येथे आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ लेटर्स २०२६’ या वार्षिक साहित्य महोत्सवात शृंगारतळीचे प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. Dr. Labde invited to ‘Festival of Letters 2026’
या महोत्सवांतर्गत “Ever Changing but Perennial Fountain – Panel Discussion on ‘Indian Thought, the Guiding Hand’” या विषयावरील परिसंवादाचे आयोजन दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.१५ वाजता करण्यात आले आहे. या परिसंवादात “भारतीय विचारधारेचे बदलते स्वरूप आणि त्यातील शाश्वत मूल्यांचा वेध घेतला जाणार आहे” यात देश विदेशातील सातशे साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. बाळासाहेब लबडे यांची वीस पुस्तके प्रकाशित असून ज्यात कादंबरी, कथा ,कविता, संशोधन, समीक्षा, अनुवाद, इत्यादींचा समावेश आहे. चित्रपट गीत लेखन, व प्रायोगिक कादंबरी लेखन या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. बाळासाहेब लबडे यांची उपस्थिती या चर्चेला विशेष परिमाण देणार असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे. साहित्य अकादमीच्या कार्यक्रम अधिकारी मृग नयनी गुप्ता यांनी त्यांना अधिकृत निमंत्रण पाठवून सहभागाची विनंती केली आहे. Dr. Labde invited to ‘Festival of Letters 2026’

या निमंत्रणामुळे साहित्य क्षेत्रात डॉ. लबडे यांच्या कार्याची पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली असून, त्यांच्या सहभागामुळे मराठी साहित्यविश्वालाही अभिमान वाटत आहे. डॉ लबडे यांना आत्तापर्यंत राज्य व राष्ट्रीय चाळीस पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. यात पद्मश्री विखे पाटील पुरस्कार, केशवसुत पुरस्कार, वांग्मय चर्चा मंडळ बेळगावचा पुरस्कार, वसंतराव राशिनकर स्मृती अखिल भारतीय साहित्य सन्मान इंदोर इ. पुरस्कारांचा समावेश आहे. ते पीएचडी मार्गदर्शक असून चार विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी प्रदान करण्यात आलेली आहे. एकूण साहित्य सेवेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना साहित्य सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आगामी चित्रपट सिडबॉल्स मधील दोन गाणी बॉलीवूडची टॉप गायिका चेन्नई एक्सप्रेस, पोस्टर निकला हिरो, चिन्मय श्रीपाद हिने गायलेली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. Dr. Labde invited to ‘Festival of Letters 2026’
