• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 March 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जानवळे गावातील शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे वाटप

by Guhagar News
March 17, 2026
in Guhagar
61 1
0
Distribution of agricultural implements to farmers
120
SHARES
342
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अनुलोमच्या मदतीने कृषी विद्यापीठाचा उपक्रम यशस्वी

गुहागर, ता. 17 : दापोली कृषी विद्यापीठाद्वारे अनुसूचित जाती उपयोजना अनुदान अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रशिक्षण व साहित्य वाटप कार्यक्रम घेतला जातो. अनुलोम या संस्थेच्या मदतीने गुहागर तालुक्यातील जानवळे येथे हा कार्यक्रम झाला. यामध्ये 39 लाभार्थ्यांना वैभव विळा व बांडगुळ कटरचे मोफत वाटप करण्यात आले. Distribution of agricultural implements to farmers

Distribution of agricultural implements to farmers

शेतीमध्ये यांत्रिकीकरण व्हावे, यासाठी दापोली कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागातर्फे विविध अवजारे, यंत्रांचे संशोधन करण्यात येते. या आधुनिक यंत्रांच्या साह्याने शेती व्हावी, यासाठी कृषी विद्यापीठामार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. अशा योजनांपैकी अनुसूचित जाती उपयोजना अनुदान नावाची योजना आहे. या योजने अंतर्गत अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांना अत्याधुनिक यंत्रांची माहिती गावात जावून किंवा विद्यापीठात नेऊन दिली जाते. तसेच या शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसीत केलेली अवजारे उत्तेजनार्थ दिली जातात. मात्र या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. Distribution of agricultural implements to farmers

Distribution of agricultural implements to farmers

अनुलोम या शासकीय योजनांवर काम करणाऱ्या संस्थेने धामणंद परिसरातील 50 शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दापोली कृषी विद्यापीठात नेले. त्यानंतर अनुलोमच्या मदतीने कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमाचे आयोजन जानवळे गावात करण्यात आले होते. दापोली कृषी विद्यापीठातील संशोधन विभागात काम करणारे व्ही. व्ही. आवारे यांनी गुंठ्यामध्ये होणाऱ्या भातशेतीमध्ये उपयुक्त लावणी यंत्र, कापणी विळा, नाचणीसाठीचे मळणी यंत्र, आदी यंत्रांची माहिती दिली. तळवळीतील प्रगतशील शेतकरी सखाराम पवार यांनी मुंबईकर ग्रामस्थांनी सणांमधील सुट्टी कमी करुन शेतीच्या दिवसात गावात येऊन शेती करण्याचे आवाहन केले. अनुलोमचे भाग जनसेवक ज्ञानेश्वर शिंदे यांनी केवळ यंत्रांची माहिती घेऊ नका प्रत्यक्ष शेतात त्याचा वापर करा. खरेदीसाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्यास अनुलोम साह्य करेल असे आवाहन केले. Distribution of agricultural implements to farmers

Distribution of agricultural implements to farmers

यावेळी जानवळेच्या सरपंच सौ. वैभवी विखारे, उपसरपंच जानवळकर यांच्या हस्ते 39 लाभार्थ्यांना कृषी अवजारे भेट म्हणून देण्यात आली. यावेळी पोलीस पाटील मंगेश कोंडविलकर, समता नगर, एकता नगर मंडळांचे अध्यक्ष, अनुलोम मित्र संदिप कोंडकविलकर, मनसेचे विनोद जानवळकर, दापोली कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक निकम सर, समन्वयक श्री कोळंबे सर आदी उपस्थित होते. Distribution of agricultural implements to farmers

Tags: Distribution of agricultural implements to farmersGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.