स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी श्री.विजय शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न
गुहागर, ता. 16 : दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोप सोहळ्यानिमित्त जिल्हा कबड्डी असोसीएशनच्या मान्यतेने पालशेत येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी श्री.विजय शिंदे यांच्या शुभहस्ते व लडॉ.विनोद शिंदे, क्रीडासंचालक, गोगटे-जोगळेकर, महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले. Kabaddi Tournament Organized by Daryavardi Pratishthan

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विनोद शिंदे, क्रीडासंचालक, गोगटे-जोगळेकर, महाविद्यालय, रत्नागिरी तसेच प्रमुख मान्यवर म्हणून ॲड.अपूर्वा बारगोडे, रत्नागिरी जिल्हापरिषद सदस्य, श्री.निलेश सुर्वे, गुहागर, पंचायत समिती सदस्य, श्रीम. रेणुका ओतारी, राष्ट्रीय खेळाडू अखिल भारतीय नागरी सेवा बुद्धिबळ व विकास दाभोळकर, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छिमार-कष्टकरी खलाशी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली. Kabaddi Tournament Organized by Daryavardi Pratishthan

तसेच दर्यावर्दी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पावरी, उपाध्यक्ष भिकाजी पालशेतकर, सचिव दिनेश जाक्कर व दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या महिला मंडळ अध्यक्षा सौ.मेघा पाटील यांच्या सोबत संस्थेचे अन्य पदाधिकारी, कार्यकारी मंडळ सदस्य, सभासद व क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले. Kabaddi Tournament Organized by Daryavardi Pratishthan
