गुहागर ता. 14 : तालुक्यातील कोतळूक येथील राजा हिंदुस्थानी कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ उदमेवाडी वतीने सलग २६ व्या वर्षी टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि. १४ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत ना. गोपाळकृष्ण गोखले क्रिडानगरीत संपन्न होणार आहेत. Cricket Tournament at Kotaluk

गुहागर तालुका क्रिकेट असो. मान्यतेने रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत मर्यादित असून या क्रिकेट स्पर्धेत २४ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रूपये २१ हजार व चषक, उपविजेत्या संघास रोख रूपये ११ हजार व चषक, तसेच मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, अंतिम सामना सामनावीर अशी वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. तरी बहुसंख्येने क्रिडा प्रेमी, नागरीक यांनी स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उल्हास आरेकर यांनी केले आहे. Cricket Tournament at Kotaluk
