गुहागर, ता. 13 : तालुक्यातील स्वातंत्र्य वाडी युवक मंडळ, वाकीतर्फे तालुकास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून 13 वर्षे नृत्य क्षेत्रात काम करणारे, झी युवा ( डान्स महाराष्ट्र डान्स) सेमी फायनलिस्ट श्री समिर अशोक महाडिक हे लाभले होते. Record Dance Competition Concluded at Waki

या रेकॉर्ड ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आगडीदेवी डान्स ग्रुप, पालशेत, द्वितीय क्रमांक सोमेश्वर डान्स ग्रुप, गुहागर (वरचा पाट दुर्गादेवी वाडी ) तर तिसरा क्रमांक डी जे कलारत्न ग्रुप, पालशेत यांना मिळाला. तसेच सोलो डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ऋत्वी रांजाणे, वरवेली, द्वितीय क्रमांक दुर्वा नाटेकर, वेलदूर, (नवानगर) तर तृतीय क्रमांक शमिका प्रशांत सावंत, आरे यांना प्राप्त झाला. सर्व विजयी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. Record Dance Competition Concluded at Waki
