गुहागर, ता. 11 : तालुक्यातील श्री स्वयंभू महागणपती मंदिर दुर्गादेवी वाडी येथे नूकतेच विविध शासकीय योजनांची परिपूर्ण माहितीबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी मार्गदर्शक एडवोकेट श्री सुशील गणपत अवेरे उपस्थित होते. तसेच समाजसेवक श्री गणेश दत्ताराम तेलगडे यांच्या प्रयत्नातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. Guidance camp at Guhagar

यावेळी मान्यवर नगरसेवक श्री संतोष सांगळे, नगरसेविका सौ स्वरा तेलगडे, मंडळाचे अध्यक्ष श्री जयंत साटले, ज्येष्ठ कार्यकर्ते जयंत काका गुणबरे, वीरेश पाडावे, महेश सांगळे, महेश तेलगडे, आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. Guidance camp at Guhagar

