• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 March 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर पंचायत समितीवर युतीचा झेंडा

by Guhagar News
March 9, 2026
in Guhagar
129 2
0
Polekar n Surve Elected for Guhagar PS
254
SHARES
725
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बिनविरोध निवड, प्रणव पोळेकर सभापती तर निलेश सुर्वे उपसभापती

गुहागर, ता. 09 : येथील पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेचे प्रणव पोळकर व उपसभापती पदी भाजपचे निलेश सुर्वे यांची बिनविरोध निवड झाली. मागचे काहीही उगाळत न बसता सर्वांना सोबत घेवून गुहागर तालुक्याच्या विकासाचा वेग वाढविणार असल्याची ग्वाही पोळेकर व सुर्वे यांनी निवडीनंतर दिली. Polekar n Surve Elected for Guhagar PS

Polekar n Surve Elected for Guhagar PS

गुहागर पंचायत समितीमध्ये शिवसेना 5, भाजप 4 व उबाठा शिवसेना 1 असे पक्षीय बलाबल आहे. आज पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाची औपचारिकता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार परिक्षित पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. मात्र दोन्ही पक्षांकडून उमेदवार कोण याची माहिती 8 तारखेला रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. रात्री उशिरा शिवसेना व भाजपने नावे जाहीर केली. 9 मार्चला सकाळी सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी 1 अर्ज दाखल झाला. दुपारी 3.30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शिवसेनेचे प्रणव पोळेकर सभापती पदी आणि उपसभापती पदी भाजपचे निलेश सुर्वे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना दोघांनी युतीच्या सर्व सदस्यांना सोबत घेत गुहागरच्या विकासाचा वेग वाढविणार असल्याचे सांगितले. तसेच संधी दिल्याबद्दल जनतेचे व पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. Polekar n Surve Elected for Guhagar PS

Polekar n Surve Elected for Guhagar PS

माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी दोघोंचे अभिनंद केले. त्यावेळी बोलताना नातू म्हणाले की, कार्यकर्त्यांनी निवडणुकीत चांगले काम केल्यामुळे तांत्रिक मुद्दा सोडला तर 14 वर्षांनी पुन्हा एकदा गुहागर पंचायत समितीवर युतीची सत्ता आली. आज एकमताने सभापती, उपसभापती यांची निवड झाली आहे. हे दोघेही अनुभवी आहेत त्यामुळे शासनाच्या योजनांबरोबर त्यांच्या कल्पनेतून नवीन योजना आखून गुहागर विकास करतील हा विश्र्वास वाटतो. Polekar n Surve Elected for Guhagar PS

Polekar n Surve Elected for Guhagar PS

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना शिवसेनेचे राजेश बेंडल म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी महायुतीचा झेंडा फडकला आहे. गुहागरमध्ये देखील एकदिलाने पोळेकर आणि सुर्वे यांनी निवड झाली आहे. भविष्यातील महायुतीची जबाबदारी वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामपंचायतीला आणि तालुक्याला सर्व विभागातून निधी मिळेल यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून गुहागर पंचायत समितीमधील लोकप्रतिनिधींनी काम करावे. अशा शुभेच्छा देतो. Polekar n Surve Elected for Guhagar PS

सत्तापदी दोन पत्रकार

गुहागर पंचायत समितीच्या सभापती पदी विराजमान झालेले प्रणव पोळेकर हे इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार आहेत. त्यांनी झी 24 तास या वाहिनीसाठी अनेक वर्ष पत्रकारीता केली आहे. या काळात त्यांनी जिल्ह्यातील अनेक प्रश्र्नांना राज्यस्तरावर नेले. समस्यांवर चर्चा घडवून आणली. पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. Polekar n Surve Elected for Guhagar PS

Polekar n Surve Elected for Guhagar PS

निलेश सुर्वे हे भाजपचे तालुकाध्यक्ष होण्यापूर्वी पत्रकार म्हणून कार्यरत होते. तरुणभारत मध्ये काम करत असताना निलेश सुर्वे यांनी देखील ग्रामीण भागातील प्रश्र्नांवर लिखाण केले. गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. गुहागरमधील ग्रामीण भागाच्या समस्यांची जाण असणारे, या समस्या सातत्याने माध्यमांमधुन मांडणारे दोन पत्रकार आज सभापती, उपसभापती विराजमान झाल्याने गुहागर तालुक्यातील पत्रकारांनी देखील आनंद व्यक्त केला. दोघांचेही अभिनंदन केले. Polekar n Surve Elected for Guhagar PS

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अभय भाटकर, सरचिटणीस सचिन ओक, जिल्हा ओबीसी अध्यी मंगेश रांगळे, नगराध्यक्ष निता मालप, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, सचिव संतोष आग्रे, शिवसेना व भाजपचे गुहागर तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी, युतीचे सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. Polekar n Surve Elected for Guhagar PS

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPolekar n Surve Elected for Guhagar PSटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share102SendTweet64
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.