तहसिलदार परिक्षित पाटील
गुहागर, ता. 07 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ मधून महसुल सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुहागरचे तहसिलदार परिक्षित पाटील यांनी केले आहे. यासाठी या अभियानाबाबत गुहागर शहरातील लोकप्र तिनिधींनी शहरातील प्रत्येक नागरीकांपर्यंत माहीत देऊन याचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहनही यावेळी केले. Take advantage of revenue services through the campaign
गुहागर शहरातील ज्ञानरश्मी वाचनालयाच्या सभागृहामध्ये गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सेव नगरसेवक, नगरसेविका, पोलिस पाटील, हायस्कुल मुख्याध्यापक, पत्रकार यांच्याजवळ गुहागर तहसिलदार यांनी या अभियानाबाबत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. Take advantage of revenue services through the campaign

तहसिलदार परिक्षित पाटील यांनी यापुढे बोलताना सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी हे अभियान राबवीण्यात येत आहे. सदर सेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. यामध्ये अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक नसणे, सनद प्रणाली संपूष्टात आणणे, एक वेळचे अधिमूल्य भरण्याची नवी तरतूद, तुकडेबंदी कायदयातील सुधारणा व अभिलेख अद्यायावतीकरण करणे या कामांचा सहभाग आहे. Take advantage of revenue services through the campaign

यामध्ये विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखलेही अभियानाच्या ठिकाणी तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील. अॅग्रीस्टॅक योजनेतंर्गत नोदी पूर्ण कराव्यात. ज्याद्वारे शेतकऱ्यांना विविध योजनांचे लाभ घेता येतील. बीपीएलमधील नागरीकांचे १८ ते ५९ वयाच्या आत अपघाती निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबाना एकाचवेळी २० हजारापर्यंत लाभ मिळवून देणे. शेतकऱ्याचा अपघाती निधन झाल्यास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात शानुग्रह अनुदानातून २ लाख रूपयाचे विमा संरक्षण देता येईल. वयोवृद्ध व्यक्तींच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देता येईल. यामध्ये ज्याठिकाणी शिबीर असेल त्याठिकाणी आधार अपडेटही करून देण्यात येणार आहे. आदी विषयाबाबत प्रश्न व त्याची उत्तरे स्वरूपात ही बैठक पार पडली. शेवटी तहसिलदार परिक्षित पाटील यांनी बोलताना या अभियानामध्ये जनतेला लाभ मिळवून देताना सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून अभियान संपले म्हणजे काम होणार नाहीत असे नाही. जनतेच्या सर्वाजनिक लाभासाठी प्रशासन तत्पर सेवादेईल असे आश्वासीत केले. Take advantage of revenue services through the campaign
यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष प्रदिप बेंडल उपस्थित होते. तसेच सर्कल अधिकारी प्रती रेवाळ, तलाठी राधा अगाव, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पोलिस पाटील, पत्रकार उपस्थित होते. यावेळी गुहागर शहरासाठी २४ एप्रिल रोजी ज्ञानरश्मी वाचनालय सभागृहामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ तर ८ मे रोजी श्री पुजा हॉल वरवेली, पाटपन्हाळे येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे तहसिलदार यांनी सांगितले. Take advantage of revenue services through the campaign
