• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 March 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गॅस सिलिंडर महागला

by Guhagar News
March 7, 2026
in Maharashtra
70 1
0
Gas cylinder price hiked
137
SHARES
392
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

घरगुती गॅस सिलिंडर ६० रू. तर व्यावसायिक गॅस सिलिंडर ११५ रू.

गुहागर, ता. 07 :  इराण-इस्त्राइल आणि अमेरिका युद्धाच्या झळा आता भारतामध्ये बसण्यास सुरूवात झाली आहे. युद्धामुळे भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १४.२ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६० रूपयांनी वाढले आहेत. तर १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ११५ रूपयांनी वाढली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नईसह देशभरात नवे दर लागू झाले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यावसायिक आस्थापनांसारख्या व्यवसायांवर गॅस दरवाढीचा परिणाम झाला आहे. Gas cylinder price hiked

घरगुती सिलिंडर थेट ६० रुपयांनी महागला आहे. महागाईच्या या धसक्यामुळे सामान्य माणसाचं महिन्याचं बजेट आता पूर्णपणे कोलमडलं आहे. आज ७ मार्चपासूनच हे नवे दर लागू झाल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. एप्रिल २०२५ पासून गॅसचे दर स्थिर होते, पण आजच्या या दरवाढीने एका झटक्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यावसायिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही 115 रुपयांची वाढ झाली आहे. Gas cylinder price hiked

मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचे दर 1720.50 रुपयांवरून 1835 रुपये रुपयांवर पोहोचले आहेत. या वाढीमुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने स्पष्टीकरण दिले आहे. देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. पुरवठा साखळी सुरळीत सुरू आहे. भारताकडे कच्चे तेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. अमेरिकेकडूनही एलपीजीची आयात सुरू झाली आहे. नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. Gas cylinder price hiked

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarगॅस सिलिंडर महागलाटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share55SendTweet34
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.