रत्नागिरी, ता. 05 : जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कक्ष, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक श्रवण दिन 6 मार्च सकाळी 10 वाजता रोजी स्व. शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आला आहे. World Hearing Day

या कार्यक्रमात कर्णबधीर दिव्यांग मुले व व्यक्तींसाठी सरकारी धोरणे, योजना याबाबत मार्गदर्शन तसेच यशोगाथा सादर करण्यात येणार आहे. संबंधितांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे यांनी केले आहे. World Hearing Day
