• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 March 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर

by Manoj Bavdhankar
March 5, 2026
in Guhagar
31 0
0
61
SHARES
174
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करण्यासाठी शासनाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 सात मार्चपासून गुहागर तालुक्यात मंडळ स्तरावर राबवली जात आहे. गुहागर महसूल विभागाच्या वतीने त्याचे नियोजन करण्यात आले आहे. Chhatrapati Shivaji Maharaj Samadhan Camp

तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गुहागर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 राबवण्यात येत आहे. मागील कालावधीमध्ये महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक नसणे, सनद प्रणाली संपुष्टात आणणे, एक वेळचे अधिमुल्य भरण्याची नवी तरतूद, तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा व अभिलेख अद्यायावतीकरण. आधी सदर सुधारणांचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विशेष जनजागृती करण्यात येत आहे. सर्वसामान्य जनता शेतकरी व शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागांमध्ये क्षेत्रीय कार्यालयाची नेहमी संबंध येत असतो. गावागावातील तळागाळातील जनतेस पारदर्शक व महसूल विषयक विविध सेवा तसेच विविध दाखले ऍग्री स्टॅग (शेतकरी नोंदणी) वगैरे करण्याकरिता यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत गुहागर तालुक्यातील क्षेत्रीय मंडळ स्तरावर शिबिरांच्या आयोजन करण्यात आले आहे. Chhatrapati Shivaji Maharaj Samadhan Camp

यामध्ये पाटपन्हाळे महसूल मंडळामध्ये 07 मार्च रोजी, हेदवी येथे 14 मार्च रोजी, आबलोली येथे 10 एप्रिल रोजी, तळवली येथे 17 एप्रिल रोजी, गुहागर नगरपंचायत येथे 24 एप्रिल रोजी, गुहागर मध्ये 08 मे रोजी तर पालशेत येथे 15 मे रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती तहसीलदार परीक्षित पाटील यांनी दिली. Chhatrapati Shivaji Maharaj Samadhan Camp

Tags: Chhatrapati Shivaji Maharaj Samadhan CampGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share24SendTweet15
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.