• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 February 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

धोपावे येथे विद्यार्थी गुणगौरव व महिला गौरव सोहळा

by Guhagar News
February 26, 2026
in Guhagar
41 0
0
धोपावे येथे विद्यार्थी गुणगौरव व महिला गौरव सोहळा
80
SHARES
228
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : धोपावे ग्रामविकास मंडळ, मुंबई (रजि.) या मंडळाचे अध्यक्ष श्री.अनिल लक्ष्मण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि धोपावे श्री हनुमान मंदिर विश्वस्त अध्यक्ष श्री विलास यशवंत निंबकर यांच्या उपस्थितीत कृष्णा जैजुरकर क्लासेस, पर्ल सेनापती बापट मार्ग दादर ( पश्चिम ) येथे संपन्न झाली. Glory ceremony at Dhopave

सुरुवातीला मान्यवर मा.श्री.विलासजी निंबकर, मा.श्री.अनिलजी चव्हाण, मा.श्री.वामनजी पवार, मा.श्री.प्रकाश डावळ यांच्या कडुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. मंडळाचे सरचिटणीस श्री.अनिल भुवड यांनी दि.२४ एप्रिल २०२४ वार्षिक सर्वसाधारण सभा, गावपातळीवर हनुमान मंदिर जीर्णोद्धार निधी संदर्भातील सभा आणि आवक, जावक पत्राचे वाचन केले. यथोचित मान्यवर आणि गावातील जेष्ठ नागरिक, आणि महिला यांचा पुष्पगुच्छ, शाल देऊन सन्मान करण्यात आला. श्री.अंकुश नाटेकर ( महाराष्ट्र पोलीस) श्री.प्रमोद सावंत, श्री.राजेश सावंत, श्री.किशोर पवार,सौ.स्नेहल कुळे,सौ.कविता सावंत,सौ.ईशा भेकरे इत्यादी कार्यकत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. Glory ceremony at Dhopave

धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबई रजि मंडळासाठी योगदान देणारे मनोज पवार, सुनिल कुळे, प्रमोद सावंत, मा.श्री.विनय कुळे, मे. के.के.फॅशन वर्ल्ड ग्रुप यांचा “सन्मानपत्र” आणि “सन्मानचिन्ह” देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

विद्यार्थी गुणगौरव सोहळा निमित्ताने कु.पार्थ लहु नाटेकर – एस.एस.सी. ८६.२०%, कु.तन्वी अनिल भुवड – एच.एस.सी.६५%,  श्री.अंकुश गोविंद नाटेकर – ( महाराष्ट्र पोलीस), सौ.ईशा ईतेश भेकरे – कुपर रुग्णालय ( परिचारिका ),  सौ.भाग्यश्री मंगेश भुवड – सुर्या हॉस्पिटल ( परिचारिका ),  डॉक्टर श्री.वैभव राजन दळी (MBBS ), कु.विराज सुनिल कुळे – सायन्स फॅस्टीवल, कु.मनाली महेश शिगवण – अधिवक्ता, श्री.लक्ष्मण गंगाराम भेकरे – अधिवक्ता, कु.पुजा नरेश कुळे -बी.फार्मसि, कु.मयुरी प्रविण कुळे- एम.कॉम, अक्षता अरुण भुवड -एम.कॉम, कु.भावेश राजेश सावंत -एच.एस.सी.( क्रिकेट सिझन बॉल ) कु.मेहक अल्ताफ खान -एच.एस.सी.७४.५०% प्राजक्ता अरुण सावंत- एम.एस.सी.( विज्ञान पारंगत ), सायली अरुण सावंत – एम,एस,सी. ( विज्ञान पारंगत ), कु.यशिका अनिल कुळे( बेसिक संगणक),  कु.नागेश प्रमोद सावंत ( बॉडी बिल्डर ) कु.रुतुजा महेश चव्हाण, १५ वी यांचा भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. Glory ceremony at Dhopave

यावेळी धोपावे ग्रामविकास महिला मंडळ ची स्थापना करण्यात आली. त्यावेळी अध्यक्ष सौ.कविता राजेश सावंत, सेक्रेटरी सौ.स्नेहल सुनिल कुळे, खजिनदार सौ.इशा इतेश भेकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनिर्वाचित महीलांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पैठणीचा खेळ रंगला लकी ड्रॉ पद्धतीने दोन पैठणी ठेवण्यात आल्या होत्या. प्रथम क्रमांक सौ. शुंभागी मनोज पवार तर द्वितीय क्रमांक : सौ.अमिषा अनिल भुवड यांनी पटकावला. Glory ceremony at Dhopave

धोपावे ग्रामविकास मंडळ ( मुंबई) रजि.मंडळाची नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्याध्यक्ष -श्री.प्रमोद शांताराम सावंत, अध्यक्ष -श्री.अनिल लक्ष्मण चव्हाण, उपाध्यक्ष – श्री.मनोज शांताराम पवार, उपाध्यक्ष -श्री.कृष्णा शांताराम कुळे, सरचिटणीस -श्री.अनिल गोविंद भुवड, सहचिटणीस -श्री.किशोर शंकर पवार, सहचिटणीस -श्री.विनय कृष्णा कुळे, खजिनदार -श्री.सुनिल प्रकाश कुळे,  सहखजिनदार – श्री.संतोष बाळु वरवेलकर यांची एकमताने निवड करण्यात आली. Glory ceremony at Dhopave

धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबई रजि मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि महिला सन्मान या सभेचे सुत्रसंचलन श्री.अनिल गोविंद भुवड यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. Glory ceremony at Dhopave

Tags: Glory ceremony at DhopaveGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share32SendTweet20
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.