• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 April 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी संघ ठरला विजेता

by Guhagar News
February 24, 2026
in Guhagar
98 1
0
Ratnagiri team wins Guhagar BPL

विजेता वीर सावरकर, रत्नागिरी संघ

192
SHARES
548
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भगवान परशुराम चषक 2026; उपविजेता ब्रम्हा बॉईज देवगड संघ

गुहागर, ता. २४ :  गुहागर ब्रह्मवृंद आयोजित भगवान परशुराम चषक २०२६ या स्पर्धेचे विजेतेपद वीर सावरकर,  रत्नागिरी या संघाने पटकावले. तर ब्रम्ह बॉईज देवगड हा संघ उपविजेता ठरला. गुहागरमधील ब्राह्मण समाजातील युवक गेल्या वर्षी पासून भगवान परशुराम चषक या नावाने क्रिकेट स्पर्धा आयोजित करत आहेत. यावर्षी  दि. २०, २१ व २२ फेब्रुवारी या कालावधीत क्रिकेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यातील १४ संघ सहभागी झाले होते. Ratnagiri team wins Guhagar BPL

Ratnagiri team wins Guhagar BPL
उपविजेता ब्रम्हा बॉईज देवगड संघ

स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने गुहागर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या संघात खेळवले गेले. स्पर्धेचा अंतिम सामना देवगड विरुद्ध रत्नागिरी असा रंगला. संपूर्ण स्पर्धेत वीर सावरकर रत्नागिरी संघाचे दोन खेळाडू वैभव जोशी आणि संकेत रानडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अंतिम सामन्यात वीर सावरकर संघाने चार षटकांत धावसंख्येचा डोंगर उभा केला. त्यामुळे दडपणाखाली आलेल्या ब्रह्म बॉईजला साखळी सामन्यातील लौकीकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यातच वीर सावरकर संघाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना चार झेल घेतले. परिणामी सामना एकतर्फी वीर सावरकर संघाने जिंकला. अंतिम सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी करणारा संकेत रानडेला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. Ratnagiri team wins Guhagar BPL

Ratnagiri team wins Guhagar BPL

विजेत्या वीर सावरकर संघाला ३३  हजार ३३३  रुपये रोख आणि भगवान परशुराम चषक देण्यात आला. तर उपविजेत्या बह्म बॉईज देवगड संघाला रु. २२ हजार २२२ रु. व चषक देऊन गौरविण्यात आले. उपांत्य फेरी गाठणाऱ्या श्रीराम कोल्हापूर आणि सिंधुरत्न स्ट्रायकर्स या दोन्ही संघाना प्रत्येकी ११ हजार १११ व चषक देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर म्हणून वीर सावरकर संघाच्या संकेत रानडे, उत्कृष्ट फलंदाज वैभव साने (वीर सावरकर रत्नागिरी), उत्कृष्ट गोलंदाज पंकज साठे  देवगड, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राकेश पाटणकर देवगड या खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू आणि चषक देऊन गौरविण्यात आले. Ratnagiri team wins Guhagar BPL

गुहागर ब्रह्म वृंद यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले होते त्याचे कौतुक विविध जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंनी तोंड भरून केले. गुहागर ब्रह्मवृंद आयोजित भगवान परशुराम चषक 2026 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये एक रणजी प्लेयर, एक खेळाडू सचिन तेंदुलकर क्रिकेट अकादमीचे हेड कोच तर एक खेळाडू हे मुंबईत व्यावसायिक क्रिकेट खेळणारे होते. त्यांच्या सहवासामुळे अनेक खेळाडूंना मार्गदर्शन मिळाले. Ratnagiri team wins Guhagar BPL

या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाचे उपाध्यक्ष बाळू शेठ, ज्येष्ठ मार्गदर्शक रघुशेठ ओक, सेक्रेटरी मिलिंद गाडगीळ, खजिनदार श्रीकांत महाजन, विश्वस्त प्रसाद वैद्य, गुहागर नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ वैशाली मावळंकर, सौ विशाखा सोमण आदी मान्यवर उपस्थित होते. Ratnagiri team wins Guhagar BPL

Tags: Bramha Boys DeovgadBramhavrund GuhagarCricketGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRatnagiri team wins Guhagar BPLVeer Savarkar Team Ratnagiriटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share77SendTweet48
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.