• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कार्यक्रमातून जागविल्या पु. लं. देशपांडेच्या आठवणी

by Guhagar News
February 21, 2026
in Guhagar
24 0
0
Vyadeshwar Festival
47
SHARES
135
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मराठी असे आमुची मायबोली;  व्याडेश्वर महोत्सव

गुहागर, ता. 21 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान आयोजित व्याडेश्वर महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी प्रसिद्ध कलाकार विघ्नेश व कल्याणी जोशी यांच्या मराठी असे आमुची मायबोली या कार्यक्रमातून पु. ल. देशपांडेच्या आठवणीतील गप्पा व गाणी या कार्यक्रमात वेगवेगळ्या धाटणीची गाणी ऐकून गुहागरकर मंत्रमुग्ध झाले. Vyadeshwar Festival

व्याडेश्वर महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्ष नीता मालप यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध कलाकार विघ्नेश जोशी यांचा पु. ल. देशपांडे यांच्या आठवणीतील गप्पा व गाणी यामधून जुन्या मराठी गाण्यांचा इतिहास उलगडला. यामध्ये पु. ल. देशपांडे बरोबरच ग. दि. माडगूळकर विद्याधर गोखले, गोविंदराव पटवर्धन, राम मराठे, आदी दिग्दज कलाकारांचा मराठीवर कशाप्रकारे प्रभुत्व होते याचे किस्से सांगितले. यावेळी गुणी बाळ असा, कौशल्येचा रामबाई, सुंदर साजिरा श्रावण आला, खेळ मांडीयेला वाळवंटी, उगवला चंद्र पुनवेचा, ऋतुराज आज वनी आला अशी एकापेक्षा एक मराठी गाणी सादर करण्यात आली. जगात सर्वाधिक बोलली जाणारी मराठी ही पंधरा नंबरची भाषा आहे. आपली भाषा टिकवण्यासाठी आपल्यातले मराठी पण जपले पाहिजे असे आवाहनही यावेळी विघ्नेश जोशी यांनी केले. यानंतर स्थानिक कलाकारांचा विविध प्रकारच्या नृत्या बरोबरच लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग व राधा संकासुराच्या नृत्याने पहिला दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. Vyadeshwar Festival

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVyadeshwar Festivalटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share19SendTweet12
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.