नंदकेश्वर किर्तनवाडी संघ विजेता तर श्री संताजी संग्राम क्रिकेट संघ उपविजेता
गुहागर, ता. 11 : श्री संताजी संग्राम क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्यदिव्य “एक वाडी – एक संघ” नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा २०२६ गुहागर तेलीआळी येथे मोठ्या उत्साहात व क्रीडाप्रेमींच्या भरघोस उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडल्या. या स्पर्धेत नंदकेश्वर किर्तनवाडी संघ विजेता तर यजमान श्री संताजी संग्राम क्रिकेट संघ उपविजेता ठरला. Night Box Cricket Tournament in Guhagar
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक नंदकेश्वर किर्तनवाडी संघाला ₹१०,१११/- रोख रक्कम व चषक तर द्वितीय क्रमांक यजमान श्री. संताजी संग्राम क्रिकेट संघ, गुहागर तेलीआळी संघास ₹५,५५५/- रोख रक्कम व चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील अंतिम सामन्याचा सामनावीर व मालिकावीर अक्षय भागडे यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच उत्कृष्ट गोलंदाज – मयूर मुकनाक, उत्कृष्ट फलंदाज – स्वप्निल राऊत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. Night Box Cricket Tournament in Guhagar

या स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर म्हणून गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, गुहागर नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. निता मालप, उपनगराध्यक्ष श्री. प्रदीप बेंडल, गुहागर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष श्री. राजेश बेंडल, श्री. चंद्रकांत झगडे सर, साहिल आरेकर, जयदेव मोरे, राज विखारे, नितिन खानविलकर, नगरसेवक समीर बागकर, नगरसेविका विदिशा दणदणे, नगरसेवक सौरभ भागडे, संतोष वरंडे, सिद्धिविनायक जाधव, संतोष गुहागरकर, अनिकेत महाडीक, भाई पालशेतकर, कल्पेश बागकर, निखिल तांबट, सदानंद पोतदार, राजेश कदम, मुकुंद गोणबरे, वैभव बेंडल, अशोक जांगळी, पराग मालप, चंद्रकांत साळवी, दिलीप गुरव, शितल कदम तसेच गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ युवक समितीचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. Night Box Cricket Tournament in Guhagar
स्पर्धेचे समालोचन सुयोग आरेकर, ऋषिकेश कचरेकर, नियाज तुरुक व अरुण भागडे यांनी प्रभावी व उत्साहवर्धक शैलीत केले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशांत रहाटे, स्वप्निल राऊत, ऋषिकेश रहाटे, राकेश राऊत, संदिप रहाटे, दिपक महाडीक, प्रकाश (बापू) रहाटे, संजय पवार, रोशन यादव, राजेश पवार, श्रीकृष्ण रहाटे, विश्वनाथ रहाटे, अथर्व राऊत, अंकुर रहाटे, प्रकाश रहाटे, महेश (बंड्या) रहाटे, संतोष राऊत, रविंद्र राऊत, संतोष रहाटे, साईराज रहाटे, शैलेश रहाटे, शौर्य कांबळे, वल्लभ वेस्वीकर, योगेश वेस्वीकर, कुणाल वेस्वीकर, दिपक वेस्वीकर, हेमंत पोतदार, प्रदीप वेस्वीकर यांनी विशेष परिश्रम घेतले. क्रीडारसिकांसाठी चहा, नाश्ता व भोजन व्यवस्थेसाठी महिला मंडळातील संपदा राऊत, आसावरी राऊत, राजश्री राऊत, सुवर्णा यादव, आरुषी रहाटे, प्रतिक्षा रहाटे, प्रियांका रहाटे, स्नेहल पवार, स्मिता रहाटे, प्राची पवार, अंजनी महाडीक, रुचा यादव, यांनी मोलाचे सहकार्य केले. Night Box Cricket Tournament in Guhagar
