जिल्हा परिषदेमध्ये युतीचे तीन, उबाठाचा एक, मनसेचा एक, तर पंचायत समितीमध्ये युतीचे 9, उबाठाचे एक उमेदवार विजयी
गुहागर, ता. 09 : गुहागर पंचायत समितीच्या दहा, तर जिल्हा परिषदेच्या पाच जागंसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने यश संपादन केले आहे. गुहागर पंचायत समितीमध्ये नऊ सदस्य निवडून आल्याने युतीने आपली सत्ता स्थापन केली आहे. जिल्हा परिषदेमध्ये युतीचे तीन, उबाठाचा एक, मनसेचा एक, तर पंचायत समितीमध्ये युतीचे 9, उबाठाचे एक उमेदवार विजयी झाला आहे. Sena-BJP alliance rules over Guhagar Panchayat Samiti
कोंडकारुळ गटात मानसी मंगेश घाणेकर (उबाठा ) – 4580 मते, अपूर्वा अनंत बारगुडे, (भाजप) – 5711 मते घेऊन विजयी झाल्या. मळण गणातून साक्षी शेखर चव्हाण (उबाठा ) 2521 मते, मानसी मंगेश सांगळे (भाजप) -2599 मते घेत विजयी झाल्या. कोंडकारूळ गणातून महेश सुरेश गोवळकर (उबाठा) – 1843 मते, प्रणव प्रमोद पोळेकर (शिवसेना) – 3292 मते घेत विजयी झाले. वेळणेश्वर गटातून नेत्रा नवनीत ठाकूर (शिवसेना) – 7458 मते घेऊन विजयी झाल्या. सिद्धी संतोष रामगडे( उबाठा) – 3241 मते मिळाली.
वेळणेश्वर गणात संदीप हरिश्चंद्र गोरिवले (शिवसेना) – 3458 मते विजयी, सचिन श्रीधर जाधव ( उबाठा) -1677 मते मिळाली. शीर गणात अँड ज्योत्स्ना विनय कातळकर (उबाठा) – 2134 मते, स्नेहा दिनेश शिगवण ( भाजप) – 3362 मते घेऊन विजयी झाल्या. पडवे गटातून महेश राघू नाटेकर ( शिवसेना) – 5975 मते विजयी झाले. तर सचिन चंद्रकांत बाईत यांना (उबाठा) – 5614 मते मिळाली. पडवे गणात रवींद्र पांडुरंग आंबेकर (उबाठा) – 1948 मते, निलेश विश्वनाथ सुर्वे (भाजप) यांनी 2945 मते घेत विजयी झाले. तर आनंद गोविंद भोजने (अपक्ष) यांना 883 मते मिळाली. पाचोरीसडा गणात सुचिता दत्ताराम घाणेकर (शिवसेना) यांनी 3000 मते घेत विजयी झाल्या. तर शशिकला रामचंद्र मोरे (उबाठा) यांना 2838 मते मिळाली. Sena-BJP alliance rules over Guhagar Panchayat Samiti

शृंगारतळी गटात प्रमोद सिताराम गांधी (मनसे ) यांनी 6158 मते घेत विजय संपादन केला. डॉ. राजेंद्र विष्णू पवार (भाजप) यांना 3987 मते पडली. तळवली गणात मंगेश गंगाराम जोशी (भाजप ) यांनी 2515 मते घेऊन विजयी प्राप्त केला. संतोष पांडुरंग जोशी (राष्ट्रवादी ) यांना 431 मते, तर रियाज हुसैन ठाकूर (काँग्रेस ) यांना 94 मते, संदीप शांताराम धनावडे (उबाठा) 2204 मते, सखाराम लक्ष्मण पवार (बहुजन समाज पार्टी) यांना 195 मते मिळाली. शृंगारतळी गणात संजय तात्याबा पवार (उबाठा) 1887 मते, गौरव सुशील बेल्हाळ (शिवसेना) यांनी 2792 मते घेत विजयी संपादन केला. Sena-BJP alliance rules over Guhagar Panchayat Samiti
जि प. असगोली गटात विक्रांत भास्कर जाधव (उबाठा) यांनी 6515 मते घेत विजयी मिळवला. तर संतोष लक्ष्मण जैतापकर (शिवसेना) 4522 मते, फरहान नजी खान सरगुरो (राष्ट्रवादी काँग्रेस) 152 मते, अरुण महादेव भुवड (अपक्ष) बळीरासेना पुरस्कृत यांना 138 मते मिळाली. अंजनवेल गण प्राजक्ता प्रवीण जांभारकर (उबाठा) 2290 मते, सारिका सचिन दाभोळकर (शिवसेना ) 2639 मते घेत विजयी मिळवला. तर भक्ती वैभव बने (राष्ट्रवादी काँग्रेस) हिला 103 मते मिळाली. असगोली गणातून पूर्वी उमेश खैर (उबाठा) यांनी 4002 मते विजयी प्राप्त केला. पूनम उदय रावणंग (शिवसेना ) 1713 मते, श्रावणी सुजित शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस) 432 मते मिळाली. Sena-BJP alliance rules over Guhagar Panchayat Samiti
