गुहागर, ता. 07 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची सकाळी मतदान टक्केवारी कमी असले तरी हे दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढत गेली. आज सकाळी साडेनऊ पर्यंत 12.59% मतदान. साडेअकरा पर्यंत 29.77%, दुपारी दीड वाजेपर्यंत 42 .80% मतदान झाले.3.39 पर्यंत 50.24% मतदान झाले. District Council and Panchayat Samiti Election
असगोली गटात पुरुष 9170 स्त्री 10598 एकूण 19768, शृंगारतळी गटात पुरुष 8191 स्त्री 9329 एकूण 17520, कोंडकरूळ गटात पुरुष 8804 स्त्री 10128 एकूण 19022, वेळणेश्वर गटात पुरुष 8805 स्त्री 11467 एकूण 20272, पडवे गटात पुरुष 9145 स्त्री 11105 एकूण 20250 .या निवडणूक असलेल्या पाच गटात एकूण पुरुष मतदार 44 हजार 115 तर महिला मतदार 52 हजार 717 असे एकूण 96 हजार 832 मतदार आहेत. तर निवडणुकीसाठी पाच गटातून 12 उमेदवार व दहा गणातून 26 उमेदवार असे एकूण 38 उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व अपक्ष उमेदवार आपलं भवितव्य आजमवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. District Council and Panchayat Samiti Election

निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी १४५ मतदान केंद्रावर एकूण ६४० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. गुहागर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती साठी निवडणूक निर्णय अधिकारी परिक्षित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरू होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सुमारे १६० पोलिस व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली होती. मतदान शांततेत पार पडल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी दिली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आता मतांची आकडेवारी सुरू केली असून प्रत्येक उमेदवार आपण निवडून कसा येईल याची खात्री पटवून देत आहे. सहा ठिकाणी मशीन चा प्रॉब्लेम आला परंतु 24 होणार ऑफिसर असल्यामुळे त्या लवकरात लवकर बसून देण्यात आल्या. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी परीक्षित पाटील यांनी दिली. District Council and Panchayat Samiti Election
