गुहागर तालुका शारीरिक शिक्षक संघाचा गौरव कार्यक्रम
गुहागर, ता. 07 : गुहागर तालुका शारीरिक शिक्षक संघ गुहागरतर्फे गुहागर तालुकास्तरीय शालेय क्रीडा शिक्षकांचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम नुकताच कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदरचा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाच्या श्रीशिवछत्रपती सभागृहात संपन्न झाला. Lifetime Achievement Award to Sports Teachers
गुहागर तालुक्यातील तालुकास्तरीय शालेय निवृत्त क्रीडा शिक्षक प्रकाश भाऊ गुरव , प्रकाश भिकाजी बापट, श्रीनिवास आण्णा पाटील, सूर्यकांत गोरखनाथ कुंभार, प्रदीप शंकर चव्हाण, अमृता रामू जबडे यांना गौरवपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते प्रदान करून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुहागर तालुका शारीरिक शिक्षक संघ गुहागरतर्फे उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. Lifetime Achievement Award to Sports Teachers

जीवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, गुहागर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मंगेश गोरिवले, सचिव पांडुरंग हासबे, पाटपन्हाळे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.एस.एस. चव्हाण, गुहागर तालुका शारीरिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजीव मोरे, उपाध्यक्ष बाळासाहेब लवटे, सचिव राजेश मोहिते, खजिनदार निलेश गोयथळे, श्री. माणगावकर, रामाणे, बंदीछोडे व इतर कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षक संघ गुहागरचे अध्यक्ष संजीव मोरे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुहागर तालुका शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सुमंत भिडे यांनी केले. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख अतिथी व मान्यवर तसेच गौरवमूर्ती यांचे सहकार्य लाभल्याबद्दल गुहागर मुख्याध्यापक संघाचे सचिव पांडुरंग हासबे यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. Lifetime Achievement Award to Sports Teachers
