• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 February 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्वसन विकाराच्या रुग्णांना मोठा दिलासा

by Guhagar News
February 5, 2026
in Guhagar
24 1
0
Relief for patients with respiratory disorders
48
SHARES
137
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अपरांत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये फुफ्फुस विकार तज्ञ डॉ. सौरभ सुर्वे रुग्णचिकित्सेकरिता पूर्ण वेळ उपलब्ध

गुहागर, ता. 05 : एकाच छताखाली अद्ययावत मल्टीस्पेशालिटी सुविधा देणाऱ्या अपरांत हॉस्पिटलमध्ये pulmonologist डॉ. सौरभ सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सौरभ सुर्वे यांनी आपले वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण मुंबई येथील प्रख्यात लीलावती हॉस्पिटल या ठिकाणी पूर्ण केले आहे. दि.१ फेब्रुवारीपासून अपरांत हॉस्पिटल येथे ते पूर्ण वेळ कार्यरत झाले आहेत. Relief for patients with respiratory disorders

आज वाढते प्रदूषण, धूम्रपान बदलते जीवनशैली आणि संसर्गजन्य आजारांमुळे फुप्फुसांचे आजार झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये योग्य वेळी श्वसनतज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे ठरते. दमा, न्यूमोनिया, क्षयरोग, धाप लागणे, छातीत जडपणा, श्वास घेण्याचा त्रास, फुफ्फुसांतील इन्फेक्शन व पाण्याचा साठा, त्याचबरोबर कोविड नंतर उद्भवलेले श्वसनाचे त्रास. या सर्व आजारांवर डॉ.सुर्वे यांचे द्वारे तज्ञ उपचार उपलब्ध होणार आहेत. Relief for patients with respiratory disorders

हृदयरोग व मधुमेह रुग्ण या रुग्णांमध्ये श्वसन विकारांचा धोका जास्त असल्याने त्यावर एकत्रित उपचार करणे, मोठ्या शस्त्रक्रिया पूर्वी फुप्फुसांची तपासणी करणे, दीर्घकाळ बेडरेस्ट असलेल्या ऑर्थोपेडिक रुग्णांमध्ये होणारे फुप्फुसांचे इन्फेक्शन टाळणे, आय सी यु मधील गंभीर रुग्णांसाठी तर pulmonologist चा सहभाग म्हणजे जीव वाचवणारी तज्ञ सेवा, Advanced pulmonary function test, nebulization therapy, Oxygen management अशा विविध परिणामकारक उपचार पद्धतीं द्वारे रुग्णांना अपरांत हॉस्पिटल येथे उपचार आता मिळणार आहेत. Relief for patients with respiratory disorders

डॉ. सौरभ सुर्वे यांचे अद्ययावत वैद्यकीय शिक्षण, व अपरांत हॉस्पिटल मधील सुविधा यामुळे श्वसन विकारांवरील आधुनिक अचूक आणि सर्वसमावेशक उपचार स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. या सेवेमुळे अपरांत हॉस्पिटल श्वसनरोग उपचारात एक विश्वासार्ह केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. Relief for patients with respiratory disorders

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRelief for patients with respiratory disordersटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share19SendTweet12
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.