• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मांडकी-पालवण येथे कृषी-सहकार मराठी साहित्य संमेलन

by Guhagar News
February 5, 2026
in Guhagar
26 1
0
53
SHARES
150
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

१३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान कोकणात साहित्य, शेती व सहकाराचा त्रिवेणी संगम

रत्नागिरी, ता. 05 : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण ता. चिपळूण, जि. रत्नागिरी यांच्या वतीने ग्रामीण-कृषी-सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य साहित्य संमेलन १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संस्थेच्या प्रशस्त क्रीडांगणावर संपन्न होणार आहे. Marathi Literature Conference at Mandki-Palvan

या संमेलनात ग्रामीण साहित्य, कृषी सुधारणा, सहकार चळवळ तसेच कोकणातील सांस्कृतिक वारसा यावर विविध परिसंवाद, कवी संमेलन, मुलाखती, ग्रंथदिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे, तसेच स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन होत आहे. Marathi Literature Conference at Mandki-Palvan

शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी रोजी संमेलनाची सुरुवात दुपारी ३ वाजता ध्वजारोहणाने होणार असून हे ध्वजारोहण प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यानंतर दुपारी ३.३० वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन असून त्याचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होईल. सायंकाळी ५.३० वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन बाबुराव बोत्रेपाटील, तसेच सायंकाळी ६ वाजता स्थानिक कवींचा कवी कट्टा आयोजित करण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ संजय चौधरी करणार आहेत. Marathi Literature Conference at Mandki-Palvan

शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी संमेलनाचा मुख्य उद्घाटन सोहळा सकाळी १० वाजता होणार आहे. उद्घाटक मा. खा. शरद पवार, प्रमुख पाहुणे मा. ना. एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) मा. ना. उदय सामंत (मराठी भाषा व उद्योग मंत्री) मा. डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ) संमेलनाध्यक्ष म्हणून कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. संजय भावे (कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली), विशेष निमंत्रितांमध्ये गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम, खासदार नारायण राणे, निमंत्रितांमध्ये आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थिती राहणार आहेत. Marathi Literature Conference at Mandki-Palvan

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे करणार आहेत. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी मा. संचालक मंडळ हे प्रयोजक आहेत.  यानंतर दिवसभर विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महत्त्वाचे परिसंवाद विषय – ग्रामीण साहित्यातील कोकण, ग्रामीण साहित्य – काल, आज व उद्या, ग्रामीण कथाकथन – सहकार साहित्य व सहकारातून समृद्धी, ग्रामीण कवी संमेलन, सायंकाळी स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. Marathi Literature Conference at Mandki-Palvan

रविवार, १५ फेब्रुवारी रोजी तिसऱ्या दिवशी कृषी व सहकार विषयावर विशेष चर्चा होणार आहे. प्रमुख सत्रे – कृषी साहित्य व शेती सुधारणा, सहकारावर विशेष मुलाखत, “आता आत्महत्या थांबवूया” हा महत्त्वपूर्ण परिसंवाद, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा व  मान्यवरांचा सत्कार सोहळा तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची उपस्थितीत संमेलनाचा समारोप दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार आहे. Marathi Literature Conference at Mandki-Palvan

यावेळी अध्यक्ष मा. ना. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) प्रमुख पाहुणे मा. ना. एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री), मा. ना. उदय सामंत (पालकमंत्री) मा. प्रा. मिलिंद जोशी (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ)विशेष निमंत्रितांमध्ये खासदार सुनील तटकरे यांच्यासह कोकणातील आमदार उपस्थित राहणार आहेत. Marathi Literature Conference at Mandki-Palvan

साहित्य प्रेमींना आग्रहाचे निमंत्रण

ग्रामीण जीवन, शेती, सहकार व मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा जागर करणारे हे संमेलन कोकणातील साहित्यिक, शेतकरी, विद्यार्थी व रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. संमेलनास उपस्थित राहून या वैचारिक व सांस्कृतिक उत्सवाचा भाग व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Marathi Literature Conference at Mandki-Palvan

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi Literature Conference at Mandki-PalvanMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share21SendTweet13
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.