• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 February 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खालचापाट येथे क्रिकेट स्पर्धेत विधाता असगोली संघ विजेता

by Ganesh Dhanawade
February 4, 2026
in Sports
61 0
0
Cricket tournament organized by Friend Circle Mandal
119
SHARES
341
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विशू ११ आबलोली संघ उपविजेता; फ्रेंड सर्कल क्रिडा मंडळातर्फे आयोजन

गुहागर, ता. 04 : खालचापाट मधील फ्रेंड सर्कल क्रिडा मंडळातर्फे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत विधाता असगोली संघ विजेता तर विशू ११ आबलोली संघाने उपविजेते पद पटकावले. या स्पर्धेत एकूण ३२ संघानी सहभाग घेतला होता‌. Cricket tournament organized by Friend Circle Mandal

स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत जाकाई मानाई घरटवाडी संघाचा पराभव करत विशू ११ आबलोली संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात राज डोर्लेकरच्या यजमान फ्रेंड सर्कल संघाचा अतितटीच्या सामन्यात ६ धावांनी पराभव करत कुंदन रोहिलकरच्या विधाता असगोली संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यातील आबलोली संघाने असगोली संघासमोर ६ षटकात ६६ धावांच आव्हान दिले. ते आव्हान असगोली संघाने कुंदन रोहिलकरच्या ११ चेंडूत ५० धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर ४ षटकात पूर्ण करत विधाता असगोली संघाने स्पर्धेच विजेतेपद पटकावले. Cricket tournament organized by Friend Circle Mandal

 विजेत्या संघाला रोख रक्कम १६ हजार रू. आणि चषक, तर उपविजेत्या संघाला रोख १० हजार रू. आणि चषक देऊन गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील मालिकावीर कुंदन रोहिलकर, स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज मकरंद पवार, स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज सिद्धार्थ पवार, स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक विराज लोखंडे, स्पर्धेतील अंतिम सामन्यातील सामनावीर कुंदन रोहिलकर, स्पर्धेतील उगवता तारा मिहीर लोखंडे, स्पर्धेतील अंतिम दिवसातील सर्वोत्तम खेळाडू कुंदन रोहिलकर, स्पर्धेतील षटकार किंग कुंदन रोहिलकर यांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले. Cricket tournament organized by Friend Circle Mandal

स्पर्धेदरम्यान मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेविका सौ. श्रीया सागर मोरे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मानस समीर आरेकर यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. Cricket tournament organized by Friend Circle Mandal

या स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला हॉटेल कोकण कट्टाचे संचालक श्री.प्रमोद गांधी, गुहागर नगरपंचायतच्या  नगरसेविका सौ. श्रीया मोरे, गुहागर नगरपंचायतीचे माजी प्रथम नगराध्यक्ष श्री. जयदेव मोरे, श्री. पद्माकर आरेकर, माजी उपसरपंच श्री.रजनीनाथ वराडकर, राज विखारे, संकेत गोयथळे , दशरथ आरेकर, वसंत पावसकर,  महेंद्र वराडकर, संदीप मोरे, नंदकुमार पावसकर , रविंद्र विखारे, संदीप गोयथळे, अनिल गोयथळे, नंदकुमार पाटील, रूपेश गोयथळे, निधी सुर्वे, सारिका कनगुटकर, प्रीती वराडकर, कल्याणी आरेकर आदी उपस्थित होते. Cricket tournament organized by Friend Circle Mandal

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. सागर मोरे, उपाध्यक्ष श्री.अनिकेत भोसले, प्रमुख कार्यवाह श्री. रोहन विखारे, खजिनदार श्री. प्रितम वराडकर, मंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲड. श्री. मयुरेश पावसकर , समिर पेंढारी, अनराज वराडकर, सुरज वराडकर, निलेश लोखंडे, विष्णू होळंब इत्यादी मंडळाचे पदाधिकारी व सभासदांनी प्रयत्न केले. संपूर्ण स्पर्धेच पंच म्हणून प्रथमेश पिलनकर, मितेश वराडकर, सुयोग गोयथळे, अभिजित मोरे, केतन गोयथळे यांनी तर समालोचन सुयोग आरेकर, विक्रांत आरेकर, आर्यन बेंडल यांनी केले. Cricket tournament organized by Friend Circle Mandal

Tags: Cricket tournament organized by Friend Circle MandalGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्याफ्रेंड सर्कल क्रिडा मंडळमराठी बातम्यालोकल न्युजविधाता असगोली संघ
Share48SendTweet30
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.