• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वसंत किल्लेकर ठरणार किंगमेकर

by Mayuresh Patnakar
February 3, 2026
in Guhagar, Politics
139 1
0
वसंत किल्लेकर ठरणार किंगमेकर?

वसंत किल्लेकर ठरणार किंगमेकर

273
SHARES
780
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

माघारीने पडवे गटात युतीचे महायुतीत परिवर्तन

गुहागर, ता. 3 : बुध्दीबळाच्या सारीपाटावर प्रत्येक सोंगटी महत्त्वाची असते, तसेच निवडणुकीच्या युध्दात एखादी घटना, व्यक्ती देखील विजय मिळवून देते. पडवे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत किल्लेकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवत घेतलेली माघारी देखील निवडणुकीचे गणित फिरवणारी ठरणार आहे. Mahayuti in Padave ZP

गुहागर तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काही तात्विक कारणांमुळे महायुती झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP Ajitdada) काही मोजक्याच गणात सक्षम उमेदवार उभे केले आहेत.  पडवे पंचायत समिती गणामध्ये कुडली गावचे माजी सरपंच वसंत थामाजी किल्लेकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यानी पंचायत समिती गणाकरता उमेदवारी दाखल केली. या गणात शिवसेना-भाजप युतीकडून (Shivsena BJP Yuti) भाजपाचे युवा नेते निलेश सुर्वे, उबाठाकडून (UBT) माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर आणि अपक्ष म्हणून मासू गावातील आनंद भोजने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे चौरंगी लढत होणार होती. Mahayuti in Padave ZP

मात्र या परिसरात भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेले सलोख्याचे संबंध. भाजप तालुकाध्यक्ष असताना निलेश सुर्वे यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार. सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा निरपेक्ष, निस्वार्थी भावनेने केलेला प्रचार. या गोष्टी लक्षात घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वसंत किल्लेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. केवळ उमेदवारी अर्जच मागे घेतला नाही तर लगेचच या जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार महेश नाटेकर आणि पंचायत समिती गणातील भाजपचे उमदेवार निलेश सुर्वे यांना पाठिंबा जाहीर केला. Mahayuti in Padave ZP

वसंत किल्लेकर यांनी पत्रकारांना सांगितले की,  देशात आणि राज्यात  महायुतीचे सरकार असल्याने विकास कामे गतीने होत आहे. पडवे गटात युतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करून मी अर्ज पाठी घेतल्यामुळे येथेही महायुती झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या तीनही उमेदवारांचा विजय निश्चित आहे. या विजयामुळे पडवे जिल्हा परिषद गटामध्ये विकासाची गंगा येण्याची मी अपेक्षा ठेवत आहे. Mahayuti in Padave ZP

वसंत किल्लेकर यांच्यासारख्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पडवे जिल्हा परिषद गटातील महायुतीचे उमेदवार महेश नाटेकर व पडवे पंचायत समिती गणाचे उमेदवार निलेश सुर्वे यांनी आभार मानले. यावेळी निलेश सुर्वे म्हणाले की, वसंत किल्लेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हे आम्हांला दिलेले आशिर्वादच आहेत. ते आम्हाला यश मिळवून देतील. Mahayuti in Padave ZP

Tags: BJPElectionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMahayuti in Padave ZPMarathi NewsNews in GuhagarshivsenaShivsena BJP YutiUBTअजितदादाजि.प.टॉप न्युजताज्या बातम्यानिवडणूकपंचायत समितीभाजपमराठी बातम्यामहायुतीराष्ट्रवादी काँग्रेसलोकल न्युजशिवसेना
Share109SendTweet68
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.