• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळंब गुरववाडीतील उबाठा पक्षातील पदाधिकारी यांचा भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश

by Guhagar News
January 31, 2026
in Guhagar
153 2
0
Ubatha Party office bearers from Velamba Gurwadi join BJP
301
SHARES
860
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 31 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्येच  वेळंब गावातील उभाठा शाखाप्रमुख अमोल अशोक गुरव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज भाजपाचे माजी आमदार डॉक्टर विनयजी नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. त्यामुळे मळण पंचायत गणामध्ये आता भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून विजय निश्चित झाल्याचे मानले जात आहे. Ubatha Party office bearers from Velamba Gurwadi join BJP  

मळण पंचायती समिती गणाच्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या उमेदवार सौ. मानसी मंगेश रांगले आणि कोंडकारूळ जिल्हा परिषद गटाकडून अपूर्वा बारगुडे या निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेळंब गावातील उभाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश हे दोन्ही उमेदवारांना मिळालेली विजयाची खात्रीच आहे.   उबाठा वेळंब चे शाखाप्रमुख अमोल अशोक गुरव, कुणबी समाज संघटना गाव अध्यक्ष मंगेश घडशी, प्रमोद निकम, नितेश गुरव त्यांच्या समवेत संपूर्ण गुरव वाडीने  आज डॉक्टर विनय नातू यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण हा पक्ष प्रवेश करत असल्याचे पक्षप्रवेश शाखाप्रमुख अमोल गुरव यांनी सांगितले. Ubatha Party office bearers from Velamba Gurwadi join BJP

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अभय भाटकर. तालुका सरचिटणीस संतोषजी सांगळे, सचिन ओक,  गुहागरच्या नगराध्यक्ष नीताताई मालप, जिल्हा परिषद उमेदवार डॉक्टर राजेंद्र पवार, अपूर्वाताई बारगुडे, मानसी रांगले, नगरसेविका मीरा घाडे, विशाखा सोमण, भाजपाचे पदाधिकारी दीपक मोरे, मंगेश रांगले, दिनेश बागकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. Ubatha Party office bearers from Velamba Gurwadi join BJP

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarUbatha Party office bearers from Velamba Gurwadi join BJPटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share120SendTweet75
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.