न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या २००८–०९ बॅचचा स्नेहमेळावा
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, तळवली येथे दि. २५ जानेवारी रोजी सन २००८–२००९ च्या माजी विद्यार्थ्यांचा प्रथमच स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. १९७२ पासून आतापर्यंत प्रथमच एखाद्या बॅचने असा स्नेहमेळावा आयोजित केल्यामुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला. Alumni get-together at Talawali
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, राष्ट्रगीत व दिवंगत शिक्षक–विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. तब्बल १६ वर्षांनंतर ही बॅच पुन्हा आपल्या शाळेत उपस्थित झाल्याने वातावरण भावुक झाले होते. यावेळी २००९ साली कार्यरत असलेले माजी मुख्याध्यापक मा. श्री प्रकाश शिर्के, मा. श्री श्रीकांत शिर्के, माजी मुख्याध्यापक श्री बसवत थरकार, माजी शिक्षक उत्तम कचरे तसेच माजी शिपाई श्री विजय पवार यांची विशेष उपस्थिती लाभली. Alumni get-together at Talawali
शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक मा. श्री महावीर थरकार, मा. श्री प्रविण केळस्कर, मा. श्री संदेश देवरुखकर, मा. श्री साळुके, मा. श्रीनाथ कुळे, मा. श्री बागल, मा. वळणी मॅडम, मा. जड्याळ, शिपाई मा. श्री अक्षय चव्हाण व मा. कु. प्रणय आरोळकर यांची उपस्थिती होती. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदीप चव्हाण व श्री संदीप चव्हाण हेही उपस्थित होते. उपस्थित सर्व शिक्षक व मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. Alumni get-together at Talawali

कार्यक्रमात २००८–०९ बॅचचा २००९ ते २०२६ या कालावधीतील सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा माजी विद्यार्थी श्री केतन शिगवण यांनी सादर केला. या कालावधीत बॅचने एकत्रितपणे तब्बल १७ सामाजिक उपक्रम राबविले असल्याची माहिती देण्यात आली. त्यामध्ये शाळेला पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, शाळेसाठी क्रीडा साहित्य (Sports Kit) उपलब्ध करून देणे, विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मेडल व ट्रॉफी देऊन सन्मान, महान क्रीडाशिक्षक श्री प्रकाश बापट सर यांचे क्रीडा क्षेत्रातील करिअर विषयक व्याख्यान, चिपळूण येथील पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपणे. अशा विविध उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला. Alumni get-together at Talawali
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक जण भावुक झाले. शिक्षक व विद्यार्थी पुन्हा एकदा शालेय जीवन जगत असल्याचा अनुभव घेत होते. शिक्षकांनीही आपले विचार मांडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू प्रदान करून सामाजिक कर्तव्याची भावना जपली. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थी आपल्या वर्गात गेले, वर्गफळ्यावर लिहिले, एकत्र हसत–खेळत, नृत्य करत अविस्मरणीय क्षण अनुभवले. Alumni get-together at Talawali
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भावुक होत म्हणाले की, “असेच सतत शाळेत येत राहा, नवनवीन उपक्रम राबवत राहा. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत.” तसेच २००८–०९ बॅचच्या माध्यमातून इतर सर्व बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनाही अशा उपक्रमांसाठी आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप श्री केतन शिगवण यांनी आभार प्रदर्शनाने केला. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केतन शिगवण, राजेश कदम, रोहित शिगवण, अमोल जोशी, निखिल पाटील, समीर भुवड, मनोज कळंबाटे, राहुल काळंबाटे व इतर सहकारी मित्रांनी केले. तसेच शाळेचे शिक्षक श्री कुळे सर, केळस्कर सर, जड्याळ सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. Alumni get-together at Talawali
