गुहागर ब्ल्यू फ्लॅग पायलट प्रकल्पासाठी दिले योगदान
गुहागर, ता. 27 : समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलट प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यानंतर गुहागरवासीयांबरोबर बोरोसिल कंपनीनेही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन दोन किलोमीटरचा समुद्रकिनारा स्वच्छ केला आहे. यामुळे गुहागरचा समुद्र किनारा स्वच्छ आणि निर्मळ करण्यासाठी बोरोसिल कंपनी ही सरसावल्याचे पहावयास मिळाले. Guhagar Beach Cleaning Campaign
गुहागर समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलट प्रकल्पाचा प्राथमिक दर्जा प्राप्त झाला आहे. समुद्रकिनाऱ्याला अंतिम दर्जा प्राप्त होण्याकरता नगरपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम राबवत आहेत. शहरवासीयांबरोबर स्वच्छता घेतल्या जात आहेत याचाच एक भाग म्हणून गुहागर नगरपंचायत व बोरोसिल कंपनी यांच्यावतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. Guhagar Beach Cleaning Campaign

यावेळी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक नगरसेविका ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. यामध्ये सर्वात मोठा सहभाग हा बोरोसिल कंपनीच्या चाळीस ते पन्नास सदस्यांचा होता. सकाळी सात वाजता या स्वच्छता मोहिमेला शुभारंभ करण्यात आला. बोरोसिल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पाटणकर यांच्या उपस्थितीमध्ये नगरपंचायतीचे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, कर्मचारी वर्ग या सर्वांनी मिळून समुद्र चौपाटी सुरू बन यांसहित दोन किलोमीटरचे क्षेत्र स्वच्छ केले. नियोजनबद्ध केलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे समुद्रकिनारा स्वच्छ व सुंदर झालेले पहावयास मिळाले. Guhagar Beach Cleaning Campaign
