• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 January 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पडवे जि.प. गटात मशालचा महाएल्गार

by Guhagar News
January 26, 2026
in Guhagar
132 1
0
पडवे जि.प. गटात मशालचा महाएल्गार
258
SHARES
738
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : पडवे जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत जिल्हा परिषद सदस्यपदासाठी रिंगणात उतरले असून, त्यांच्या प्रचारामुळे संपूर्ण परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विकासकामांचा ठोस पाया, जनतेशी थेट संवाद आणि ठाकरे विचारांवरील निष्ठा या जोरावर ही लढत अधिकच निर्णायक बनत चालली आहे. प्रचारादरम्यान बोलताना सचिन बाईत म्हणाले, ९० टक्के विकासकामांच्या भूमिपूजांचा नारळ आम्ही फोडलेला आहे आणि ही कामे प्रत्यक्षात सुरू आहेत. उर्वरित १० टक्के कामेही लवकरच पूर्णत्वास नेली जातील. कामे केवळ कागदावर नाहीत तर प्रत्यक्षात जमिनीवर दिसत आहेत, हे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले. Torchlight procession in Padve ZP group

गेल्या तीन महिन्यांपासून गावोगावी, वाडी-वस्तीवर सातत्याने प्रचार करत असल्यामुळे लोकांना नेमका कसा विकास हवा आहे, हे मला जवळून समजले आहे, असे सांगत त्यांनी जनतेशी असलेला विश्वासाचा दुवा अधोरेखित केला. आजही जनतेचा अढळ विश्वास ठाकरे ब्रँडवर आहे, हाच विश्वास मशाल चिन्हाची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या विकास निधीचा विशेष उल्लेख करत सांगितले की, आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून मिळालेल्या विकास निधीमुळे या भागातील अनेक रखडलेली कामे मार्गी लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, आरोग्य सुविधांशी संबंधित अडचणी मोठ्या प्रमाणात सुटल्या असून, नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळाला आहे. त्यामुळेच या संपूर्ण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असून, त्याचे सकारात्मक परिणाम आज स्पष्टपणे दिसत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. Torchlight procession in Padve ZP group

राजकीय वास्तवाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, अनेकांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला, मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवणार्‍या खर्‍या शिवसैनिकांनी योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. हीच इतिहासाची पुनरावृत्ती पडवे जिल्हा परिषद गटातही होणार असून, निष्ठा आणि विकासाच्या बाजूनेच जनता कौल देणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही निवडणूक केवळ एका पदासाठी नाही, तर विकास, विश्वास आणि ठाकरे विचार जपण्यासाठी आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत मशाल चिन्हाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पडवे जिल्हा परिषद गटात सध्या मशाल चिन्हाभोवती जोरदार वातावरण तयार झाले असून, ही लढत केवळ राजकीय नसून विकासाच्या भक्कम पायावर उभी असलेली आणि निष्ठेची कसोटी पाहणारी ठरणार आहे, असे स्पष्ट चित्र दिसत आहे. पडवे गटात ठाकरे गटाचा प्रचार वेग घेत असून, सचिन बाईत यांची उमेदवारी राजकीय समीकरणे बदलणारी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. Torchlight procession in Padve ZP group

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTorchlight procession in Padve ZP groupटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share103SendTweet65
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.