लेखिका : प्रा. सौ. मनाली मनोज बावधनकर, सेक्रटरी – ज्ञानराश्मि वाचनालय, गुहागर
आज 26 जानेवारी 2026 ला ज्ञानरश्मि वाचनालयाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. ज्ञानरश्मि वाचनालयचे अमृत महोत्सवी वर्ष होते. 600 पुस्तकांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आज 30 हजार ऐवढी ग्रंथ संपदा आहे. गुहागर गावा बद्दलचे प्रेम, त्याच्यां शिक्षणा विषयी असणारी आस्था, वाचनाची आवड आणि आपल्या गावाचा विकास होण्यासाठी ज्या प्रमाने हा ज्ञानरूपी वृक्ष लावला त्याचा आता डेरेदार वटवृक्ष तयार झाला आहे. याच्या सावलीत अनेक विद्यार्थी, वाचक ज्ञानसंपन्न होत आहेत. या जडणघडणीत कै. महादेव अनंत भावे यांच्याबरोबरच अनेक वाचन प्रेमी, शिक्षण प्रेमी, साहित्य प्रेमी, दाते यांचे मोलाचे सहकार्य हे लाभले. Amrit Mahotsavi Gyanrashmi Library
वाचनालय म्हणजे पुस्तके, साहित्य, वर्तमानपत्रे आणि इतर माहिती – साधने जतन करून ठेवण्याची व वाचकांना उपलब्ध करून देण्याची जागा, जी ज्ञान, मनोरंजन आणि शिक्षणाचे केंद्र असते. जी माहितीचा प्रसार करताना सामाजिक विकासाला हातभार लावतात. एखादे शहर, गाव किती ज्ञानसंपन्न आहे? हे त्या गावातील वाचनालय, त्यामधील असणारी ग्रंथ संपदा आणि वाचक वर्गाची संख्या, त्यांचे वाचन यावरून ठरवू शकतो. वाचनालय जेवढी समृद्ध तेवढे तेथील नागरिक ज्ञानी असतात. पारतंत्र्यामध्ये असताना आपल्याला आपल्यातील अनेक त्रुटी लक्षात आल्या. ज्ञान सर्वां प्रर्यंत पोहचवण्याचे माध्यम पुस्तकं, ग्रंथ आहेत, आणि त्यांना जतन करून ठेवणारी वाचनालय आहेत. Amrit Mahotsavi Gyanrashmi Library

असे ज्ञानसंपन्न वाचनालय आपल्या गावात ही असावे, गावातील नागरिकांना चांगली पुस्तक, ग्रंथ, वर्तमानपत्र वाचनास मिळावे असा उदात्त हेतू ठेऊन दिवाणबहादुर महादेव अनंत भावे यांनी गुहागर गावामध्ये छोटेखानी वाचनालय सुरु केले. 1950 साली 600 पुस्तकांनी वाचनालयाची एका छोट्या खोली मध्ये सुरवात केली. यासाठी त्यांनी स्वता:च्या मालकीची जागा वाचनालयासाठी दिली. त्याचवर्षी त्यांनी वाचनालयाला मान्यता ही मिळवून आणली. स्वातंत्र्याचे वारे जोरदार वाहत असताना, वाचनालयासारख्या वास्तू उभारणे गुहागरसाठी आनंदाची गोष्ट होती. Amrit Mahotsavi Gyanrashmi Library
काही महीन्यातच वाचनालयाची प्रगती झपाटय़ाने होऊ लागली. पुस्तकं, ग्रंथांची संख्या वाढू लागली. वाचक वर्ग ही त्याच संख्येने वाढत होता. आता वाचनालय मोठे करण्याची गरज भासू लागली. अवघ्या तीन वर्षात म्हणजे 26 जानेवारी 1953 साली वाचनालयाची मोठी वास्तु स्वखर्चाने कै. महादेव अनंत भावे यांनी उभारली. ती इमारत २०२० पर्यंत उभी होती. कै. महादेव भावे यांनी आपल्या सुविद्य पत्नी वाराणसी भावे यांच्या इच्छेनुसार “ज्ञानरश्मि” हे नाव देण्यात आले होते. ज्ञानाचा किरण असणारे हे वाचनालय, नावास सार्थ ठरले. . स्थापनेपासून आजपर्यंत स्वातंत्र्यवीर विनायक दा. सावरकर, साहित्यिक व पत्रकार आचार्य अत्रे, कुसुमताई अभ्यंकर, मधु मंगेश कर्णिक, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, लेखक मारुती यादव, नागनाथ कोतापल्ले, अशोक बागवे, इंद्रजित भालेराव, अरुणा ढेरे, अभिराम भडमकर, गजानन कोटवार यासारख्या अनेक मान्यवरांनी वाचनालयाला भेट दिली. Amrit Mahotsavi Gyanrashmi Library

कालौघात जुनी इमारत आता मोडकळीस आली होती. पुस्तक, ग्रंथाची वाढती संख्या, वाचकांची संख्या पाहता आता इमारत मोठी आणि सुसज्ज होणे गरजेचे होते. म्हणून ज्ञानरश्मि वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर व सर्व संचालक मंडळाने निर्णय घेऊन वास्तुचे नूतनीकरण करण्यात आले. यामध्ये महिला विभाग, बाल विभाग, वाचन विभाग असे विभाग केले. डॉ. तानाजीराव चोरगे सभागृह ही तयार केले. आज सर्व सुविधांसहीत,सुसज्ज अशी नूतन वास्तु गुहागरच्या कोंदणात उभी आहे. Amrit Mahotsavi Gyanrashmi Library
‘ग्रंथालयामाजी बसे क्षणभरी । तोचि ज्ञान कण वेचितसे’ या उक्तीप्रमाणे या वाचनालयाचे कार्य सुरू आहे. ज्ञानरश्मि वाचनालयाच्या संचालकांनी अनेकविध उपक्रम, कार्यक्रम यशस्वी केले आहेत. वाचन चळवळीला प्रेरणा देणारे कोकण विभागीय साहित्य संमेलन, जिल्हा साहित्य संमेलन, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय अधिवेशन यासारख्य भव्य कार्यक्रमांचे यशस्वीरित्या नियोजन केले. दरवर्षी वाचनालय गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, उत्तम वाचक सन्मान, जेष्ठ महिला वाचक सन्मान, उत्कृष्ठ बाल वाचक यासारखे सन्मान देण्यात येतात. त्याच बरोबर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, रंगभरण स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्याने, पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन सारखे कार्यक्रम वाचनालयात सतत होत असतात. Amrit Mahotsavi Gyanrashmi Library
