रत्नागिरी, ता. 24 : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. Observers appointed for Zilla Parishad and Panchayat Samiti elections

यामध्ये पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे हे रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूरसाठी निरीक्षक म्हणून काम पाहणार असून, त्यांचा संपर्क क्रमांक 9920782571 असा आहे. तर मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण व गुहागरसाठी पश्चिम उपनगरे बांद्रा (पू) अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) गणेश मिसाळ यांची नियुक्ती निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9730675008 असा आहे. Observers appointed for Zilla Parishad and Panchayat Samiti elections
नियुक्त निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक निरीक्षण करणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही तक्रारी किंवा निवडणूकविषयक बाबींसाठी संबंधित निरीक्षकांशी संपर्क साधावा. Observers appointed for Zilla Parishad and Panchayat Samiti elections
