गुहागर, ता. 24 : जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व माध्यमिक शिक्षण विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान रंजन स्पर्धेत सोहम समीर बावधनकर या विद्यार्थ्याने जिल्ह्यामध्ये पाचवा क्रमांक मिळवला. Soham Bavdhankar wins science competition

या परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्यातील प्रथम पाच विद्यार्थ्यांची निवड केली गेली होती. त्यांची जिल्हास्तर परीक्षा घेण्यात आली. या यशाबद्दल सोहम बावधनकर याचे शाळा व संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सोहम हा यापूर्वी नासा इस्त्रो स्कॉलरशिप नवोदय या परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. Soham Bavdhankar wins science competition
