गुहागर, ता. 23 : प्रजासत्ताक दिनानिमित्त अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चिपळूण येथे दि. २६ जानेवारी २०२६ रोजी मेडिसिन, ऑर्थोपेडिक व जनरल सर्जरी विभागांचे एकत्रित भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये पार पडणार आहे. Health camp at Aparant Hospital
या शिबिरात प्रख्यात जे. जे. हॉस्पिटलमधून प्रशिक्षित एम.डी. मेडिसिन विभागाचे डॉ.गायकवाड, फिजिशियन डॉ. हर्षद होन अपरांत हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध जनरल सर्जन डॉ.सद्गुरु पाटणकर तसेच अपरांत हॉस्पिटलचे जॉईंट रिप्लेसमेंट व ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.श्रीश भास्करवार, फिजिओथेरपीस्ट डॉ. रुचिरा सुर्वे आणि आहारतज्ञ डा. ऋषिकेश बर्वे यांचे द्वारे नागरिकांची तपासणी करून तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. तसेच आरोग्य शिबिरात हाडांचा ठिसूळपणा तपासण्यासाठी मोफत बी.एम.डी. (Bone Mineral Density) तपासणी, श्वसनक्षमता तपासण्यासाठी मोफत स्पायरोमेट्री चाचणी, तसेच ब्लड प्रेशर, रक्तदाब व ईसीजी (हृदय तपासणी) या महत्त्वाच्या तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. Health camp at Aparant Hospital

बी.एम.डी. तपासणीमुळे महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळणाऱ्या ऑस्टिओपोरोसिस (हाडांचा ठिसूळपणा) या आजाराचा लवकर शोध घेणे शक्य होणार आहे. स्पायरोमेटरी तपासणीमुळे दमा, सीओपीडी, श्वसनाचे आजार ओळखण्यास मदत होणार आहे. ब्लड प्रेशर व ईसीजी तपासणीद्वारे हृदयरोगाचा धोका, उच्च रक्तदाब याबाबत रुग्णांना वेळीच मार्गदर्शन लाभणार आहे. Health camp at Aparant Hospital
रुग्णांना एकावेळी मूळ आजाराव्यक्तिरिक्त सांधेदुखी, श्वसन विकार, उच्च रक्तदाब, पोट दुखी, यासारख्या विविध समस्या उद्भवतात. मूळ आजारांवर उपचार घेतले जातात परंतु त्याच दरम्यान उद्भवलेल्या इतर आजारांकडे दुर्लक्ष केले जाते. सामान्यतः रुग्णांची ही गरज ओळखून अपरांत हॉस्पिटल द्वारे एकाच दिवशी एका छताखाली सर्व उपचार व मार्गदर्शन हे ध्येय घेऊन या शिबिराचे आयोजन केले आहे. अपरांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ने आयोजित केलेल्या या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा याकरिता ८३८०८६०१३६ या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. Health camp at Aparant Hospital

