अँड चिनार आरेकर; जनतेने सतर्क रहावे
गुहागर, ता. 23 : गुहागर शहरात काही ठिकाणी विद्युत केबल चोरीच्या घटना घडत असून जनतेने सतर्क रहावे, असे आवाहन एडवोकेट आरेकर यांनी केले आहे. काल त्यांच्या मोडकाआगर येथील श्रीपूजा फार्म मधून २ पाण्याच्या पंपच्या आरमाड केबल चोरीस गेल्या आहेत. त्याबद्दल गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. तसेच गुहागर शहरामध्ये चौकशी केली असता अन्य बरेच ठिकाणी अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. Cable theft on the rise in Guhagar

यापूर्वी वरवेली येथील श्री. अरुण रहाटे यांच्या बागेतील पंपाच्या केबल चोरीस गेल्या होत्या. अशा अनेक घटना घडलेल्या असून काहींनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या वायर चोरट्यांचा सुळसुळाट असून आपण सर्वांनी सतर्कता बाळगून जर कोणी संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्वरित पोलीस ठाण्यात कळवावे. तसेच अशा प्रकारचे चोरीचे प्रकार कोणाकडे झाले असतील तर ते उघडकीस आणा व पोलिस ठाण्यात तक्रार द्या. कारण तक्रार झाल्यावरच पोलीस पुढील कारवाई करू शकतील, असे आव्हान चिनार आरेकर यांनी ग्रामस्थांना केले आहे. Cable theft on the rise in Guhagar