• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 January 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ब्ल्यू फ्लॅग पायलट स्टेट्स मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

by Manoj Bavdhankar
January 23, 2026
in Guhagar
159 1
0
Blue Flag Pilot States Marathon Competition
312
SHARES
890
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर नगर पंचायतच्यावतीने आयोजन

गुहागर, ता. 23 :  गुहागर नगर पंचायत आयोजित ब्ल्यू फ्लॅग पायलट स्टेट्स मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात नगराध्यक्ष नीता मालप व मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आली. या स्पर्धेला तब्बल 300 जणांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा दोन किलोमीटर, चार किलोमीटर व सहा किलोमीटर अशी घेण्यात आली. महिला व पुरुष स्वतंत्र गटात ही स्पर्धा झाली. Blue Flag Pilot States Marathon Competition

Blue Flag Pilot States Marathon Competition

या स्पर्धेमध्ये सहा किलोमीटर महिलांमध्ये प्रथम क्रमांक समृद्धी गुजर, द्वितीय क्रमांक सानिका पालशेतकर तर तृतीय क्रमांक श्रुती  घाणेकर. सहा किलोमीटर पुरुष मध्ये प्रथम क्रमांक आर्या नाके, द्वितीय क्रमांक अनिकेत नितोरे, तृतीय क्रमांक अंकुश  चाळके. चार किलोमीटर महिलांमध्ये प्रथम क्रमांक वैभवी ढवळे, द्वितीय क्रमांक भक्ति गुजर, तृतीय क्रमांक सोनाली आलीम तर पुरुष मध्ये प्रथम क्रमांक वीर मेटकर, द्वितीय क्रमांक सुनील रेवाळे, तृतीय क्रमांक नुपूर कनस्कर. दोन किलोमीटर महिला गटात प्रथम क्रमांक चिन्मय शिगवण, द्वितीय क्रमांक अनुष्का घाग, तृतीय क्रमांक रोशनी संमगीसकर, तर पुरुष मध्ये  प्रथम क्रमांक आदित्य गमरे, द्वितीय क्रमांक अर्णव शिगवन, तृतीय क्रमांक ओंकार लाड या सर्व स्पर्धकांना मेडल व प्रथम क्रमांकसाठी तीन हजार, द्वितीय क्रमांक दोन हजार व तृतीय क्रमांक एक हजार रुपये देऊन  मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. Blue Flag Pilot States Marathon Competition

Blue Flag Pilot States Marathon Competition

या स्पर्धेसाठी दुर्गादेवी देवस्थान, व्याडेश्वर देवस्थान, किरण खरे, प्रथमेश दामले, शार्दुल भावे, शामकांत खातू, चिनार आरेकर, साहिल आरेकर, श्रमिक भाटकर, गजानन वेल्हाळ, श्रीहरी पानवलकर, संकेत साळवी, सुधाकर कांबळे, सचिन मुसळे, ग्रामीण रुग्णालय गुहागर, खरे ढेरे कॉलेज गुहागर, देव गोपाळ कृष्ण विद्यालय गुहागर, बालभारती हायस्कूल अंजनवेल, पत्रकार संघ गुहागर, गुहागर नगर पंचायत कर्मचारी यांनी  ब्ल्यू फ्लॅग पायलट स्टेट्स मॅरेथॉन साठी सहकार्य लाभले. Blue Flag Pilot States Marathon Competition

Blue Flag Pilot States Marathon Competition

या स्पर्धेमध्ये नगरपंचायत, नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब राशिनकर यांनी केले. स्पर्धा बघण्यासाठी गुहागरवासीयांनी समुद्रावर गर्दी केली होती. Blue Flag Pilot States Marathon Competition

Tags: Blue Flag Pilot States Marathon CompetitionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share125SendTweet78
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.