गुहागर, ता. 21 : शहरात उबाठा शिवसेनेच्यावतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तर भाजप शिवसेना युतीच्यावतीने 4 जिल्हा परिषद व ९ पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. District Council and Panchayat Samiti Election
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य शक्तीप्रदर्शन करत मिरवणूक काढुन आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेच्यावतीने सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये पडवे जिल्हा परिषद गटासाठी उबाठाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, वेळणेश्वर जिल्हा परिषद गटासाठी सिद्धी रामगडे, कोंडकारूळ जिल्हा परिषद गटासाठी मानसी घाणेकर, शृंगारतळी जिल्हा परिषद गट हा मनसेसाठी देण्यात आला असून मनसेचे गुहागर संपर्कप्रमुख प्रमोद गांधी, असगोली जिल्हा परिषद गटासाठी आ. भास्कर जाधव यांचे पूत्र व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच १० पंचायत समिती गणासाठी सर्व जागांवर उबाटा शिवसेनेचे उमेदवार दिले आहेत. यामध्ये पाचेरी सडा गणासाठी शशिकला मोरे, पडवे गणासाठी माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र आंबेकर, वेळणेश्वर गणासाठी युवासेना उपजिल्हाधिकारी सचिन जाधव, शीर गणासाठी जोन्सा काताळकर, कोंडकारूळ गणासाठी मुंबईचे संपर्क प्रमुख महेश गोवळकर, मळण गणातून साक्षि चव्हाण, शृंगारतळी गणासाठी माजी सरपंच संजय पवार, तळवली पंचायत समिती गणासाठी वडद ग्रामपंचायतीचे सरपंच संदिप धनावडे, असगोली पंचायत समिती गणासाठी उर्वी खैर, अंजनवेल गणासाठी प्राजक्ता जांभारकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. District Council and Panchayat Samiti Election

भाजप-शिवसेना युतीच्यावतीनेही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य शक्तीप्रदर्शन करत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, तालुकाध्यक्ष अभय भाटकर, चिटणीस सचिन ओक, नगराध्यक्ष नीता मालप व सर्व नगरसेवक तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, सरचिटणीस संतोष आग्रे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, शहरप्रमुख निलेश मोरे, उपनगराध्यक्ष प्रदिप बेंडल यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते. District Council and Panchayat Samiti Election

भाजप शिवसेना युतीच्यावतीने चार जिल्हा परिषद व ९ पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये पडवे गटातून शिवसेनेच्यावतीने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, वेळणेश्वर गटासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ. नेत्रा ठाकूर तर भाजपकडून शृंगारतळी गटासाठी माजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र पवार तर कोंड कारूळ गटासाठी अपूर्वा बारगोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. पंचायत समिती गणासाठी शिवसेनेकडून असगोली गणासाठी पूनम रावणंग, पाचेरी सडा गणासाठी सुचिता घाणेकर, शृंगारतळी गणासाठी गौरव वेल्हाळ, कोंडकारूळ गणासाठी प्रणव पोळेकर, वेळणेश्वर गणासाठी संदिप गोरिवले, भाजपाच्यावतीने पडवे गणासाठी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, तळवली गणासाठी मंगेश जोशी, मळण गणांसाठी मानसी रांगळे, शीर गणासाठी स्नेहा शिगवण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. District Council and Panchayat Samiti Election
