रत्नागिरी पोलिसांचे यश
गुहागर, ता. 19 : रत्नागिरी पोलीस दलाने AI आधारित “RAIDS” (Ratnagiri Advanced Integrated Data System) अॅपचा प्रभावी वापर करत हरवलेल्या मुलीचा यशस्वी शोध घेण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून विकसित झालेल्या या अॅपमुळे तपास प्रक्रियेला वेग आणि अचूकता मिळाली. Missing girl found with the help of AI technology
दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तक्रार नोंदताच मुलीचे छायाचित्र RAIDS अॅपमधील ‘मिसिंग पर्सन्स’ विभागात अपलोड करण्यात आले. Dev-Drushti AI प्रणालीच्या सहाय्याने त्या छायाचित्राच्या तब्बल १०८ वेगवेगळ्या AI जनरेटेड प्रतिमा तयार करून शोध मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात आली.

या अत्याधुनिक तांत्रिक प्रणालीमुळे संबंधित मुलगी इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील व त्यांच्या तपास पथकाने तात्काळ हालचाली करत मुलीचा सुखरूप शोध घेतला. सदर मुलीस सुरक्षितपणे रत्नागिरी येथे आणून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. AI आधारित RAIDS अॅपच्या वापरामुळे हरवलेल्या व्यक्तींचा शोध जलद आणि अचूकपणे घेणे शक्य होत असून, तंत्रज्ञानाधारित व नागरिक केंद्रित पोलीसिंगचा हा रत्नागिरी पोलीस दलाचा आणखी एक उल्लेखनीय दाखला ठरला आहे. Missing girl found with the help of AI technology