गुहागर, ता. 19 : माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान धारा – विज्ञान नाट्य स्पर्धा 2026 यामध्ये श्रीदेवी गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या शाळेने सुयश संपादन केले आहे. सदर स्पर्धा ही चिपळूण येथील ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट हायस्कूल येथे उत्साहात संपन्न झाली. Science Drama Competition 2026

गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर च्या विद्यार्थिनींनी विज्ञान नाट्य स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक व उत्तेजनार्थ पटकावला. या स्पर्धेत ग्रंथा पाटील, अनुजा घुमे, स्वरा पाटील, मैथिली तावडे, श्रावणी राऊत, सिमरन मालप या विद्यार्थिनी सहभाग घेतला होता. या सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांच्या हस्ते गुलाब पुष्प व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापिका सुजाता कांबळे, पर्यवेक्षिका सोनाली हळदणकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. Science Drama Competition 2026
