गुहागर, ता. 19 : जुदो फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने दि 23 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत कलकत्ता येथील डुम्रजला इंडोर स्टेडियम, हावडा वेस्ट बंगाल येथे ज्युनियर गट राष्ट्रीय जुदो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 18 खेळाडूंची निवड महाराष्ट्र जुदो असोसिएशयने केली आहे. या संघाचे व्यवस्थापक पदी रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेचे मुख्य प्रशिक्षक निलेश गोयथळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Junior Group National Judo Competition

निलेश गोयथळे यांनी यापूर्वी देखील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघासाठी प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश टिळक व महासचिव दत्ता आफळे यांनी शुभेच्छा दिल्या. Junior Group National Judo Competition
